त्रासाला कंटाळून कार्यकारी अभियंत्यांचा राजीनामा?

By Admin | Updated: December 20, 2014 00:02 IST2014-12-20T00:02:41+5:302014-12-20T00:02:41+5:30

महापालिका दरदिवसाला कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिध्दीच्या झोतात येत असते. मात्र, सदस्यांच्या जाचाला कंटाळून कार्यकारी अभियंत्याने राजीनामा दिल्याचा प्रकार ....

Embarrassed to quit the executive engineer? | त्रासाला कंटाळून कार्यकारी अभियंत्यांचा राजीनामा?

त्रासाला कंटाळून कार्यकारी अभियंत्यांचा राजीनामा?

अमरावती : महापालिका दरदिवसाला कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिध्दीच्या झोतात येत असते. मात्र, सदस्यांच्या जाचाला कंटाळून कार्यकारी अभियंत्याने राजीनामा दिल्याचा प्रकार पहिल्यांदाच उघडकीस आला आहे. हा राजीनामा आयुक्तांनी तुर्तास मंजूर केला नसला तरी सदस्यांचे ‘अर्थकारण’ यामागे असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंत्यावर राजीनामा देण्याचा प्रसंग उद्भवल्याने कर्मचारी हळहळ व्यक्त करीत आहेत. महापालिकेत सदस्य, पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचण्यापेक्षा नोकरीचा राजीनामा देणे बरे, या निर्णयाप्रत हे कार्यकारी अभियंता पोहोचले आहेत. त्यामुळेच काही दिवस दीर्घ सुटीवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. हे कार्यकारी अभियंता महापालिकेत सकाळी १० ते उशीरा रात्रीपर्यंत सतत कामात व्यस्त असल्याचे सर्वच सदस्य खासगीत कबूल करतात. तरी देखील ‘अर्थकारण’ आले की, सारेच सदस्य माणुसकी विसरुन प्रामाणिक अधिकाऱ्यांना नोकरासारखी वागणूक देतात, अशीही चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
एखादा अधिकारी कामचुकार असेल तर त्याच्यावर प्रशासकीय कारवाई नक्कीच झाली पाहिजे. मात्र, कार्यकारी अभियंत्याचे काम अतिशय प्रामाणिक आणि पारदर्शक असताना कंत्राटदाराकडून ‘कमीशन’ वसुलीसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, ही मागणी करणे लोकशाहीत कितपत योग्य आहे, याचे चिंतन पदाधिकाऱ्यांनी करणे आवश्यक झाले आहे. ज्या कार्यकारी अभियंत्याची सेवा महापालिकेत ३० वर्षांपेक्षा जास्त झाली.

Web Title: Embarrassed to quit the executive engineer?