शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती शहर आयुक्तालयातील महिला पोलिसांना आठ तासांची ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST

कॉमन प्रदीप भाकरे अमरावती : शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आठ तास ड्युटी देण्याचा स्तुत्य निर्णय पोलीस आयुक्त डॉ. ...

कॉमन

प्रदीप भाकरे

अमरावती : शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आठ तास ड्युटी देण्याचा स्तुत्य निर्णय पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी घेतला आहे. २३ सप्टेंबरपासून त्या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. अमरावती शहर आयुक्तालयातील सुमारे २७५ महिला पोलीस अंमलदारांना या निर्णयाचा लाभ होईल.

नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी अन्य पोलिस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ असा निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करणारे अमरावती शहर आयुक्तालय तिसरे पोलीस घटक बनले आहे.

पोलीस दलात कर्तव्य करीत असलेल्या महिलांना १२ तास काम करावे लागते. महिला पोलिसांना कामाबरोबरच कौटुंबिक जबाबदारी पार पाडावी लागते. अनेक वेळा सण, उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे या निमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा १२ तासांपेक्षा जास्त कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर आणि कर्तव्यावरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागपूर पोलीस आयुक्तालयात पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

आता अमरावती शहर पोलीस दलातील महिलांना २३ सप्टेंबरपासून आठ तासच कर्तव्य करावे लागणार आहे. या निर्णयाचे महिला पोलिसांनी जोरदार स्वागत केले आहे. शहर आयुक्तालयात तूर्तास १९०९ पैकी १७०३ पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. त्यात २७५ च्या घरात महिला पोलीस अंमलदार आहेत.

///////////////

कोट

पोलीस महासंचालकांनी महिला पोलिसांना येणाऱ्या अडचणींचा सहानभुतीपूर्वक विचार करून त्यांना आठ तास ड्युटीच्या निर्णयाबाबत इतर घटकांनी विचार करावा, असे सुचविले होते. त्यानुसार गणेश विसर्जनानंतर शहर पोलीस दलात प्रायोगिक तत्त्वावर महिला पोलिसांना आठ तास ड्युटीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे.

डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती

/////////

कोट

महिला पोलिसांवर ड्युटीसह कौटुंबिक जबाबदारी असते. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी घेतलेला आठ तास ड्युटीचा निर्णय आम्हा महिला पोलिसांसाठी खूपच स्तुत्य आहे. आम्ही आपाद स्थितीत पोलीस म्हणून २४ तास कामावर असतोच. या निर्णयामुळे कुटुंबालाही वेळ देता येणे शक्य आहे.

एक महिला पोलीस, शहर आयुक्तालय