शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दरमहा एक प्रमाणे आठ केंद्र संमेलन घेण्याचे आदेश

By admin | Updated: May 18, 2015 00:08 IST

केंद्र संमेलन हा प्रशासनाचा महत्त्वाचा भाग आहे. यात केंद्रसंमेलनाद्वारे येत्या शैक्षणिक सत्रापासून सुसूत्रता आणण्याचा...

नव्या शैक्षणिक अंमलबजावणी : शिक्षकांच्या सुटीवर संक्रांतअमरावती : केंद्र संमेलन हा प्रशासनाचा महत्त्वाचा भाग आहे. यात केंद्रसंमेलनाद्वारे येत्या शैक्षणिक सत्रापासून सुसूत्रता आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग राज्य शासनाने हाती घेतला. त्याची अंमलबजावणी शनिवार ११ जुलै २०१५ पासून करण्यात येणार आहे. या धोरणानुसार शासनाने दुसरा व चौथा शनिवार निश्चित केला आहे. जुलैतील पहिले केेंद्र संमेलन दुसऱ्या शनिवारी घेण्याचे आदेश दिले आहेत. शनिवार दिवशी शाळेची वेळ ही अर्ध्या दिवसाची राहते. त्यामुळे यात बदल करुन हे केंद्र संमेलन दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. राज्यात २००२ पासून सर्व शिक्षा अभियान सुरु झाले. या अभियानाचा एक भाग म्हणून केंद्र संमेलन सुरु आहेत. मात्र आतापर्यंत केंद्र संमेलन घेणे केंद्र प्रमुखापुरतेच मर्यादित होते. त्यामुळे प्रत्येक केंद्रप्रमुख सोईनुसार केंद्रसंमेलन घ्यायचे. आतापर्यंत यात एकवाक्यता व सुसूत्रता आणण्याचा महत्त्वाचा बदल या वर्षापासून केला गेला. यापूर्वीचे केंद्रसंमेलन जेवणावळी व सत्कार समारंभासारख्या अनौपचारिक बाबींमुळे टीकेचा विषय झाला होता. केंद्र संमेलनात होणारा हा खर्चसुध्दा आयोजकांवर भुर्दंड पडता होता. मात्र आता नव्या सूचनानुसार केंद्र संमेलनातून जेवणावळी, सत्कार, निरोप समारंभ आदी कार्यक्रमांना फाटा देण्यात आला. शैक्षणिक वर्षात दरमहा एक याप्रमाणे ८ केंद्र संमेलन घ्यावयाची असून प्रत्येक केंद्र संमेलनाचे वेळापत्रक ठरवून देण्यात आलेले आहेत. परिपाठाने केंद्रसंमेलन सुरु करायचे असून त्यानंतर आदर्श पाठ व शैक्षणिक विषय ठरवून दिलेले आहेत. यात पुस्तकावर चर्चा घेण्याचा व त्यासाठी दर संमेलनात पुढील वेळी वाचून याच पुस्तकाची यादी पुरविण्यात आलेली आहे. दुसरा व चौथा शनिवार हे पूर्ण सुटीचे दिवस असूनही या दिवशी अधिकारी वर्गालाही केंद्र संमेलनाचे सनियंत्रण करावे लागणार आहे. केंद्र संमेलन शनिवारऐवजी शुक्रवारी दुपारी २ ते ५ घेण्याची मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. शनिवार दिवशी सकाळपाळी शाळा असल्यामुळे सकाळपासूनच शिक्षकांना शाळेवर उपस्थित रहावे लागणार आहे. सायंकाळपर्यंत उपाशीपोटी केंद्रसंमेलनात मन कसे रमेल, याचा विचार शासनाने करावा किंवा या केंद्रसंमेलनाच्या दिवशी नास्त्याची व चहापाण्याची व्यवस्था प्रशासनाव्दारे करण्यात यावी. आयोजकांवर याचा कुठलाही भुर्दंड देण्यात येऊ नये. केंद्रसंमेलन केंद्र शाळेवरच घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळू बोरसे पाटील, राज्य सरचिटणीस उदय शिंदे, राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे, उपाध्यक्ष चंद्रकांत पुसतकर, राज्य प्रतिनिधी राजेश सावरकर, राज्य महिला प्रतिनिधी अलका देशमुख यांनी केली आहे. (प्रतिनिधी)केंद्र संमेलनास प्रशिक्षणाचा दर्जाकेंद्र संमेलनास आता प्रशिक्षणाचा दर्जा देण्यात आला असून प्राथमिक शिक्षकांना वर्षभरात पूर्ण करावयाच्या २० दिवसांत केंद्र संमेलनाचे ८ दिवस धरले जातील. त्यामुळेही केंद्र संमेलनास महत्त्व प्राप्त होणार आहे. यापूर्वी कार्यालयीन कामाच्या दिवशी केंद्र संमेलनाचे आयोजन केले जात होते. मात्र आता शनिवार या अर्ध्या सुटीच्या दिवशी केंद्र संमेलन घ्यावयाचे आहे. या दिवशी सकाळी २ तास दैनंदिन अध्यापन व शालेय पोषण आहाराची जबाबदारी पूर्ण करुन उर्वरित सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० या वेळेत केंद्र संमेलन करावयाचे आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सुटीवर संक्रांत आल्याची भावना शिक्षक समितीने व्यक्त केली.