शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

आठ शिक्षण महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाचा गुंता कायम; शिक्षकांची उच्च न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 19:50 IST

विद्या परिषदेच्या बैठकीत मंथन

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत शिक्षण आणि शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या आठ महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाचा गुंता कायम आहे. आजमितीस ही महाविद्यालये ओस पडली असून, त्यांच्या संलग्नीकरणास भोपाळ येथील नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनने (एनसीटीई) नकार दिला आहे. या महाविद्यालयांमध्ये कार्यरत शिक्षकांनी समायोजनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या महत्वााच्या विषयावर विद्यापीठात विद्या परिषदेत सोमवारी मंथन झाले.

आठही महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करावे, यासाठी संस्थाचालकांनी अमरावती विद्यापीठाला पत्र दिले आहे. त्याअनुषंगाने मध्यंतरी विद्यापीठाने विद्या परिषदेने घेतलेला निर्णयाच्या आधारे या आठ महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाबाबत अधिष्ठातांची समिती गठित केली. या समितीने विद्यापीठाला वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला.

मात्र, भोपाळ येथील एनसीटीईने जारी केलेल्या महाविद्यालयांच्या संलग्नीकरण रद्द आदेशाविरुद्ध काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तीन याचिका दाखल केल्या.  हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, शिक्षकांनी ही महाविद्यालये बंद करण्यास नकार दिला आहे. शिक्षकांचे समायोजन होईस्तोवर या महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करू नये, असे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठ, भोपाळ येथील एनसीटीईला या आठ महाविद्यालयांच्या संलग्नीकरणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा कायम असणार आहे.ही आठ महाविद्यालये बंद होण्यासाठी अर्ज

 

  • स्व. अनिल रामदास कांबे बी.एड. कॉलेज, सिरसो, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
  • साई शिक्षण महाविद्यालय, लोहारा, यवतमाळ 
  • ईश्वर देशमुख शिक्षण महाविद्यालय, दिग्रस, जि. यवतमाळ
  •  विदर्भ युवक विकास संस्थेचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, बुलडाणा
  • गोविंदराव पवार शारीरिक शिक्षण महाविद्यालय, कळंब, जि. यवतमाळ
  •  लोकहित बी.पी.एड. महाविद्यालय, यवतमाळ
  • दादासाहेब राजपूत शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मलकापूर, जि. बुलडाणा
  • शहीद भगतसिंह शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती.

आठ महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाबाबत चर्चा झाली. मात्र, विद्या परिषदेत निर्णय होऊ शकला नाही. या महाविद्यालयांच्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सुटला नाही. एनसीटीईच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात शिक्षक गेले आहेत. तूर्तास न्यायालयामुळे काहीही निर्णय घेता येत नाही.  - राजेश जयपूरकर, प्र-कुलगुरू, अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAmravatiअमरावती