वांगी, टोमॅटोने बिघडविले बजेट हिरव्या मिरचीने केले तोंड लाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 05:00 AM2021-10-13T05:00:00+5:302021-10-13T05:00:56+5:30

जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उत्पादित भाजीपाला कमी येत असल्याने बाहेर जिल्ह्यातून दररोज हजारो क्विंटटल भाजीपाला शहरात येतो. त्यात डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च पाहता भाजीपाला मंगळवारी ५० ते १६० रुपये प्रतिकिलोने नागरिकांना खरेदी करावा लागल्याचे वास्तव आहे.

Eggplant, tomatoes spoiled budget green peppers made red mouth | वांगी, टोमॅटोने बिघडविले बजेट हिरव्या मिरचीने केले तोंड लाल

वांगी, टोमॅटोने बिघडविले बजेट हिरव्या मिरचीने केले तोंड लाल

Next

इंदल चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ऑक्टोबरच्या संततधार पावसाने भाजीपाला खराब झाला. त्यामुळे बाजारपेठेत आवक कमी व वाढता वाहतूक खर्च पाहता दामदुप्पट दराने भाजीपाला खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. त्यात बारमाही उपयोगात येणाऱ्या वांगीने आर्थिक बजेट बिघडविले, तर हिरवी मिरची ८० रुपयांवर पोहचल्यामुळे गृहिणींचे तोंड लाल झाले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उत्पादित भाजीपाला कमी येत असल्याने बाहेर जिल्ह्यातून दररोज हजारो क्विंटटल भाजीपाला शहरात येतो. त्यात डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च पाहता भाजीपाला मंगळवारी ५० ते १६० रुपये प्रतिकिलोने नागरिकांना खरेदी करावा लागल्याचे वास्तव आहे.

नाशिकहून येतो टोमॅटो
जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन फार कमी प्रमाणात घेण्यात येते. वाढत्या मागणीनुसार टोमॅटोची तोकडी आवक नागरिकांची गरज भागवू शकत नसल्याने नाशिक येथून टोमॅटो बोलविला जातो. त्यातच डिझेल दरवाढीने वाहतूक खर्चापोटी कधी नव्हे इतके भाव टोमॅटोचे वाढलेले पहावयास मिळत आहे.

कांदा दिवाळीपर्यंत ६० 
जिल्ह्यात कांदा धुळे, सोलापूर व कर्नाटक राज्यातून बोलावले जातात. मात्र, पाऊस सुरू राहिल्याने धुळे, सोलापूरसह कर्नाटक येथून होणारी कांद्याची आवक कमी झाली. त्यामुळे यंदाही दिवाळीत कांदा ५० ते ६० रुपयांपर्यंत खरेदी करावा लागणार असल्याची माहिती कांद्याचे व्यापारी सतीश कावरे यांनी दिली.

भाजीपाल्याचे दर अपेक्षेपेक्षा अधिक वाढल्याने अर्धा किलोऐवजी एकच पाव घ्यावा लागत आहे. परंतु, स्वस्त असो वा महाग गरजेनुसार खरेदी करावाच लागतो. 
- अर्चना गौतम मेश्राम, गृहिणी

सर्व डाळींचेही दर वाढलेले असून, पावसाने भाजीपाला खराब झाल्यामुळे तेदेखील कधी नव्हे इतके वाढले आहे. सामान्य माणूस महागाईने डबघाईस येऊ लागला आहे 
- रमेश राठोड, एक ग्राहक

पावसामुळे खराब झाला. तसेच वाहतूक खर्च प्रतीकिलो १० रुपये झाल्याने भाजीपाल्याचे दर सद्यस्थितीत सर्वाधिक आहे. आम्हाला २-५ रुपये नफ्याने विकावा लागत आहे.     - प्रकाश बाहेकर, विक्रेता

 

Web Title: Eggplant, tomatoes spoiled budget green peppers made red mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.