शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी काळात परगावांतून येणारे नागरिक वाढले; टेस्ट मात्र तेवढ्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. महिनाभरात नऊ हजारांवर कोरोना पाॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने हादरा बसला. नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली. परिणामी ऑक्टोबरपासून कोरोना संसर्ग घटला अन् नागरिक बिनधास्त झाले. जणू काही कोरोना संपला, अशा  थाटात काहींना मास्क, फिजिकल डिस्टन्सचा विसर पडला. याच काळात दिवाळीचा सण आला. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

ठळक मुद्देबाजारपेठेतही तोबा गर्दी, बहुतेक ठिकाणी नमुने संकलन केंद्रही बंदच

  लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे जरी म्हटले जात असले तरी यंदाच्या दिवाळीत ‘कोरोना इफेक्ट’ जाणवलाच. बाहेगावी असणारे बहुतेक सर्वच दिवाळीला घरी  गावी आलेत; मात्र कोरोना चाचणी करायचा विसर पडला. या आठवड्यात चाचण्यांची संख्या रोडावली. याला कारणही नेमके हेच आहे. याशिवाय दिवाळीच्या अगोदरपासून बहुतेक नमुने संकलन केंद्रेही बंद होती. त्यामुळेही चाचण्यांच्या संख्येत कमी आलेली आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. महिनाभरात नऊ हजारांवर कोरोना पाॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने हादरा बसला. नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली. परिणामी ऑक्टोबरपासून कोरोना संसर्ग घटला अन् नागरिक बिनधास्त झाले. जणू काही कोरोना संपला, अशा  थाटात काहींना मास्क, फिजिकल डिस्टन्सचा विसर पडला. याच काळात दिवाळीचा सण आला. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा फज्जा उडाला. बहुतेक ठिकणी असलेले  कोरोना नमुने संकलन केंद्रेही बंद झाली. नागरिक चाचणी टाळू लागल्याने या काळात चाचण्यांची संख्या कमी आली. प्रशासनानेही प्रोटोकाॅलनुसार चाचणी सुरू केल्याने कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णसंख्या घटली आहे. 
दरम्यान, दिवाळीच्या काळात झालेल्या गर्दीत ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्ती व असिम्प्टमॅटिक रुग्ण वावरल्याने पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आता शाळा सुरू झाल्याने शिक्षकांचीही चाचण्यांसाठी गर्दी झाली आहे.

आता कोणालाही करता येणार आरटी-पीसीआर टेस्ट

 जिल्ह्यात तसे पाहता ऑक्टोबर महिन्यांपासूनच नमुने संकलन केंद्रावर चाचण्या करण्यासाठी नागरिकांची गर्दी कमी व्हायला लागली. याचा थेट परिणाम अहवालांवर झाला. कोरोनाग्रस्तांची  संख्या रोडावल्याने नागरिकांमध्ये बिनधास्तपणा वाढला.

 सुरुवातीला चाचण्यांसाठी गर्दी वाढली होती. त्यानंतर आरोग्य विभागाचा प्रोटोकाॅल आला. त्यानुसार चाचण्या सुरू केल्याने नागरिक परतायला लागले. आता मात्र हे निकष बाद ठरविण्यात येऊन कोणालाही आरटी-पीसीआर चाचणी करता येते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या