शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘डुप्लिकेट’ कन्हान रेतीच्या कारखान्यावर धाड

By admin | Updated: June 26, 2016 23:58 IST

बडनेरामध्ये डुप्लिकेट कन्हान रेती तयार करून बिनबोभाट विक्री सुरू असल्याचे सप्रमाण वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच महसूल विभागाचे धाबे दणाणले.

श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेराबडनेरामध्ये डुप्लिकेट कन्हान रेती तयार करून बिनबोभाट विक्री सुरू असल्याचे सप्रमाण वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच महसूल विभागाचे धाबे दणाणले. 'लोकमत'च्या दणक्यानंतर खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने रविवारी म्हणजे सुटीच्या दिवशीदेखील या कारखान्यावर धाड टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान २० ब्रास रेती जप्त करण्यात आली. आता याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विटांच्या कारखान्यातील वेस्टेज मटेरिअल जसे विटांचा चुरा व नाल्यातील रेती मिसळून कन्हानची डुप्लिकेट रेती तयार करण्याचा प्रकार मागील अनेक दिवसांपासून बडनेरा शहरात सुरू होता. 'लोकमत'ने याबाबतचा वृत्तांत सलग दोन दिवस सप्रमाण प्रकाशित केल्यानंतर महसूल विभागामध्ये खळबळ उडाली.महसूल विभागाची भूमिका संशयास्पदबडनेरा : १० किलोमीटर परिसरातील नाल्यांमधून निकृष्ट दर्जाची रेती आणून त्यात विटांचा चुरा, कारखान्यातील वेस्ट आणि दगड याचे यंत्राद्वारे मिश्रण करून डुप्लिकेट कन्हान रेती तयार केली जात होती. या रेतीमुळे अनेक ग्राहकांची तर फसवणूक होतच होती, शिवाय या रेतीचा वापर करून केल्या जाणाऱ्या बांधकामाचा दर्जाही ढासळत होता. त्यामुळे शासकीय जमिनीवर सुरू असलेला हा प्रकार बंद करून यात गुंतलेल्या लोकांवर कारवाई करण्यात यावी, असे वृत्त ‘लोकमत’ने लावून धरले होते. याप्रकरणी असलेली महसूल विभागाची संशयास्पद भूमिका देखील लोकमतने लोकांसमोर मांडल्याने अखेर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला. कारवाई दरम्यान २० ब्रास रेती महसूल विभागाने जप्त केली. तसेच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे लेखी पत्र बडनेरा पोलिसांना देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महसूल विभागाच्या पथकात नायब तहसीलदार धीरज मांजरे, मंडल अधिकारी शंकर गोरडे, तलाठी भगत, अजय पारेकर यांचा सहभाग होता. ‘महसूल’मध्ये खळबळ : २० ब्रास रेती जप्त, फौजदारीच्या हालचाली‘लोकमत’चा दणका, रविवारी कारवाई बडनेरात डुप्लिकेट कन्हान रेती तयार होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली. या वृत्ताने पायाखालची जमीन सरकलेल्या महसूलच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सुटीच्या दिवशी त्या अवैध कारखान्यावर धाड टाकली. तहसीलदार सुरेश बगळे यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली. ‘लोकमत’मुळे अनेकांची फसवणूक टळली आहे, हे विशेष. जप्त रेतीच्या सुरक्षेसाठी ‘महसूल’ कर्मचारी तैनातडुप्लिकेट कन्हान रेती तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकल्यानंतर जप्त केलेल्या रेतीच्या सुरक्षेसाठी महसूल विभागाचा कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. या रेतीचा लिलाव केला जाईल, असे नायब तहसीलदार धीरज मांजरे यांनी सांगितले. रेतीचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित इसमावर फौजदारी कारवाई करण्याचे पत्र पोलिसांना देऊ. जप्त रेतीचा लिलाव करण्यात येईल. शासकीय भूखंडाचा असा वापर खपवून घेतला जाणार नाही. - सुरेश बगळे,तहसीलदार, अमरावती