शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले

By admin | Updated: June 23, 2014 23:39 IST

देशाच्या जडणघडणीत शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असताना सुखी संपन्न असलेला बळीराजा आज देशोधडीला लागला आहे. २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

वरुड : देशाच्या जडणघडणीत शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असताना सुखी संपन्न असलेला बळीराजा आज देशोधडीला लागला आहे. २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतकरी पेरणीकरिता पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. महागाईमुळे मजुरीचे दरसुध्दा वधारल्याने शेतकऱ्यांपेक्षा शेतमजूर सुखी, असे म्हणण्याची वेळ आली आहे. यामुळे समस्याग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा कोणाला कळणार? हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यावर्षी कोरडा दुष्काळ पडण्याची चिन्हे दिसत आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, व्यापाऱ्याकडून सातत्याने होणारी शेतकऱ्यांची लूट आणि व्यापाऱ्यांना पाठीशी घालणारे राजकारणी असा त्रिकोण तयार झाला आहे. एकामेकांवर कुरघोडी करुन झटपट श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात शेतकरी भरडला जात आहे. शासन शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचे अधिक हित जोपासते. कृषी विभागाचे अधिकारी केवळ बोटावर मोजण्याइतक्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ देतात. एवढेच नव्हे तर ७० टक्के शेतकऱ्यांना कृषी विभागाचे कार्यालयदेखील माहीत नाही. कारण कार्र्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांना खुर्चीसोबत संवाद साधावा लागतो. शेतकऱ्यांच्या कार्यशाळांना शेतकरीच अनुपस्थित असतात, असा गवगवा होतो. परंतु राजकारणी यातही राजकारण करतात. या देशाचा खरा शेतकरी कोण हे शोधण्याची वेळ आली आहे. राजकारणीच शेतकरी, व्यापारी आणि उद्योगपती बनतात. यामुळे शेतकऱ्यांची वाट लागली आहे. शेतीच्या मशागतीसाठी महिलांचे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. काही गर्भश्रीमंत शेतकऱ्यांनी मिरची, कपाशी ठिंबक सिंचनावर लावली असली तरी निसर्गाच्या पावसाशिवाय तिची वाढ खुंटत आहे. तर तापमानसुध्दा मोठ्या प्रमाणावर असल्याने ठिबक सिंचनावर घेतली जाणारी पिकेसुध्दा करपू लागली. तसेच विद्युत भारनियमनाला सुध्दा शेतकरी कंटाळले असल्याने तुषार किंवा ठिबक सिंचन चालविणे दुरापास्त झाले आहे. संत्रा उत्पादक शेतकरी मृग बहराच्या फुटण्याची वाट पाहत असून पावसाअभावी शेतकऱ्यांची ही परवड होत आहे. मृगाने दगा दिल्याने आंबिया बहराचीही फूट नाही. कपाशी, सोयाबीन, तूर पिकासह आदी पिके २० दिवसांपासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. मशागतीची कामे पूर्ण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)