शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन वाहनचालक तर्राट (असाईनमेंट)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:14 IST

दीड वर्षांत १३५ कारवाया, लॉकडाऊनमुळे मद्यपींचे फावले प्रदीप भाकरे अमरावती : मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे धोकादायक असल्याने व त्यातून ...

दीड वर्षांत १३५ कारवाया, लॉकडाऊनमुळे मद्यपींचे फावले

प्रदीप भाकरे

अमरावती : मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे धोकादायक असल्याने व त्यातून अपघातासारखे गंभीर प्रकार घडत असल्याने पोलीस प्रशासनाची तळीरामांवर करडी नजर राहते. दैनंदिन कारवाईसोबतच पोलिसांकडून तळीरामांविरोधात ‘थर्टी फर्स्ट फीव्हर’ उतरेपर्यंत शहरात कठोर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, कोरोना संक्रमण, लॉकडाऊनने पोलिसी कारवाईवर मर्यादा आणल्या आहेत. ब्रीथ अ‍ॅनालायझरचा बंद केलेला वापर व मास्कच्या वापरामुळेदेखील मद्यपींची तपासणी थंडावली आहे.

शहर, बाजारपेठ व तालुका पोलीस ठाण्यासह शहर वाहतूक शाखेतर्फे फिक्स पॉईंट लावून ब्रीथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तळीरामांची चाचणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. ‘थर्टी फस्ट’च्या सुमारास या कारवाईला वेग यायचा. मात्र, यंदा ब्रीथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे होणारी तपासणी बंद करण्यात आली. जे उघड्या डोळ्याने झिंगलेले दिसले, त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली. आता कोरोना संक्रमण हळूहळू कमी होत असल्याने या कारवाईवर भर दिला जाणार आहे, असे वाहतूक पोलीस शाखेकडून सांगण्यात आले.

बॉक्स

ब्रीथ अ‍ॅनालायझरचा वापर बंद

कोरोना संक्रमण टाळण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांकडून ब्रीथ अ‍ॅनालायझरचा वापर बंद करण्यात आला. शिंकल्यास, खोकल्यातून कोरोनाचा संसर्ग वाढीस लागत असल्याने तो निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता केवळ भरधाव वेगाने वाहन हाकणारे, नो पार्किंगवरील वाहने लक्ष्य केली जात आहेत.

२०२१ मध्ये मद्यपी वाहनचालकांवर झालेली कारवाई (जुनपर्यंत)

जानेवारी २२

फेब्रुवारी ०९

मार्च २६

एप्रिल ०

मे ०

जून ०

---------------

मद्यपी वाहनचालकांवर झालेली कारवाई २०२०

जानेवारी १

फेब्रुवारी १

मार्च ०

एप्रिल ०

मे ०

जून ०

जुलै ०

ऑगस्ट ०

सप्टेंबर ०

ऑक्टोबर १४

नोव्हेंबर २०

डिसेंबर ४२

---------------

कोट

गतवर्षी मार्चपासून कोरोना संक्रमण व पाठोपाठ लॉकडाऊन लागले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार, ब्रीथ अ‍ॅनालायझरचा वापर बंद करण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यंदादेखील पहिल्या तीन महिन्यांत कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतर पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्याने कारवाईवर मर्यादा आल्या.

किशोर सूर्यवंशी

-------------------