शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या ट्रकखाली चिरडून चालक ठार

By admin | Updated: March 13, 2017 00:02 IST

ट्रक दुरूस्तीचे काम करताना सिलिंडरच्या दुसऱ्या एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने स्वत:च्याच ट्रकखाली चिरडून चालकाचा दुर्देवी मृत्यू झाला.

अमरावती : ट्रक दुरूस्तीचे काम करताना सिलिंडरच्या दुसऱ्या एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने स्वत:च्याच ट्रकखाली चिरडून चालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. हा विचित्र अपघात शनिवारी रात्री नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील सावर्डी पुलाजवळ घडला. कल्लुराम गुजर (३८,रा.छिंदवाडा) असे मृताचे नाव आहे. कल्लुराम गुजर केमिकलने भरलेला ट्रक क्र. एम.एच.१४-सीपी-७५५४ घेऊन नागपूर मार्ग अमरावतीकडे येत होते. दरम्यान सावर्डी पुलाजवळ ट्रक खालून काही आवाज येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ट्रकमध्ये बिघाड झाल्याची शंका आल्याने चालक कल्लू गुजरने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला आणि खाली उतरून ट्रक च्या खाली गेला. ट्रक चालक ताब्यातअमरावती : त्याचवेळी अचानक त्याच मार्गाने एम.एच.४० एन.-३३१६ क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने कल्लू गुजर यांच्या ट्रकवर येऊन धडकला. त्यामुळे ट्रक खाली काम करणारा कल्लू गुजर हा स्वत:च्याच ट्रकखाली चिरडला गेला. अपघातास कारणीभूत असणारा ट्रकचालक संतोष सीताराम इंगळे (रा.नागपूर) हा नागपूरवरून अमरावतीकडे रिकामे सिलिंडर घेऊन येत होता. निष्काळजीपणे ट्रक चालवून त्याने कल्लू गुजरच्या ट्रकला जबर धडक दिली. याअपघातात कल्लू गुजर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. मृत कल्लू गुजरचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला गेला. येथे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचे पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आले. याघटनेत रामू धुर्वे (३८, रा. छिंदवाडा) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)