शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या स्वप्नपूर्तीसाठी २,२६८ कोटींचा ‘डीपीआर’

By admin | Updated: June 26, 2016 00:09 IST

केंद्र पुरस्कृत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील संभाव्य प्रवेशासाठी महापालिकेने २२६८ कोटी रुपयांचा फेरप्रस्ताव बनविला आहे.

ग्रीनफील्डसह रेट्रोफिटिंग मॉडल्स : ३० जूनअखेर प्रस्तावअमरावती : केंद्र पुरस्कृत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील संभाव्य प्रवेशासाठी महापालिकेने २२६८ कोटी रुपयांचा फेरप्रस्ताव बनविला आहे. ग्रीनफील्ड व्यतिरिक्त रेट्रोफिटिंग, पॅनसिटी आणि रि-डेव्हलपमेंट ही तीन मॉडेल्स या फेरप्रस्तावाची वैशिष्ट्ये आहेत. ही बहुप्रतीक्षित फेरप्रस्तावाचे प्रारूप ३० जूनपर्यंत केंद्र शासनाला पाठविले जाणार असल्याची माहिती शनिवारी आयुक्त हेमंत पवार यांनी पत्रपरिषदेत दिली.केंद्र शासनाच्या स्मार्टसिटी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अमरावती महापालिकेचा समावेश न झाल्याने दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्र शासनाने २५ ते ३० जून दरम्यान फेरप्रस्ताव मागितले होते. त्यानुसार जुन्याच आलिया या एजंसीने हा फेरप्रस्ताव बनविला आहे. पहिल्या फेजमधील प्रस्ताव तब्बल ५५०० कोटी रुपयांचा होता. प्रकल्प किंमत निम्म्यावर आणून आणि त्यात ‘रेट्रोफिटिंग’ ही नवीन प्रणाली समाविष्ट करण्याचे महत्कार्य आलिया कंपनीने केले आहे. अमरावती शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्पात हा समावेश असावा, याबबतचा ऊहापोह फेरप्रस्तावात करण्यात आला आहे. सुमारे ११०० एकर जागेवर अमरावती शहरासह स्मार्ट सिटी बनविण्याचे नियोजन असून त्यासाठी २२६८ रुपयांचा निधी लागू शकतो, असा अंदाज महापालिकेच्यावतीने या फेरप्रस्तावाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ज्या २० शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली त्या शहरांचे डिपीआर अभ्यासण्यात आले. लोकसहभागही घेण्यात आला व त्यानंतर सर्वंकष प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती आलिया कंपनीतर्फे देण्यात आली.(प्रतिनिधी)काय असेल स्मार्ट सिटी?कृषी आधारित उद्योगावर आधारित अर्थव्यवस्था, २० हजार नव्या नोकऱ्या आणि पाच ते दहा वर्षात १० हजार नवीन घरे, टेक्सटाईल इंडस्ट्रीसाठी रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट सेंटर, अ‍ॅग्रोटेक व इन्फरमेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीसाठी कॅपासिटी बिल्डींग, शाळा, फॅशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट.स्मार्ट सिटीची वैशिष्ट्येछत्रीतलावनजीक ३५० एकर जागेवर ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट केली जाणार आहे. रेट्रोफिटिंगमध्ये यशोदानगर ते दस्तुरनगर या विद्यमान भागाचा विकास करून स्मार्ट सिटीचे ध्येय गाठले जाणार आहे. स्मार्टसिटीच्या फेर प्रस्तावात ‘रिडेव्हलपमेंट’ ही बाबही अंतर्भूत करण्यात आली आहे. पॅनसिटी मॉडेल्समध्ये स्मार्ट सोल्युशन व नवतंत्रज्ञानाचा वापर अपेक्षित आहे. वॉटरसप्लाय, इलेक्ट्रीसिटी, ट्रान्सपोर्ट अ‍ॅन्ड मोबिलिटी, सिसीटीव्ही, सोलर, हाऊसिंग याशिवाय महापालिकेतील सर्व सेवा आॅनलाईन होतील.