शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकात दिव्याखाली अंधार

By admin | Updated: June 7, 2015 00:25 IST

महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाचे तत्कालीन विभाग प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल यांच्या कारनाम्याने या ....

कारवाईपूर्वीच दिली जाते टिप्स : जयस्वाल नामक कर्मचाऱ्याचा प्रतापअमरावती : महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाचे तत्कालीन विभाग प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल यांच्या कारनाम्याने या विभागाला गालबोट लागले असताना याच पथकात त्यांचे लहान बंधू कार्यरत असल्याने हे पथक कारवाईला निघाले की हॉकर्स, अतिक्रमण धारकांना टिप्स दिली जात असल्याची तक्रार पोलीस निरिक्षकांनी दिली आहे. परिणाणी या पथकात दिव्याखाली अंधार, असा कारभार सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाचे निरीक्षक खराबे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. या पथकात कार्यरत कन्हैया जयस्वाल यांचे अतिक्रमण धारकांसोबत लागेबांधे असल्याचे पोलीस निरीक्षक खराबे यांनी थेट आरोप करीत तसे पत्र उपायुक्त विनायक औगड यांना दिले आहे. यापूर्वीचे अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल यांच्या कारनामे संपत नाही तोच लहान बंधू कन्हैया जयस्वाल यांनी पैसे कमविण्यासाठी वेगळी बासरी वाजविण्याचा प्रकार सुरु केला आहे. हल्ली अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे हे आहेत. त्यांच्या सोबतीला कन्हैया जयस्वाल आहेत. परंतु हे पथक कारवाईला निघाले की जयस्वाल हे साटेलोटे असलेल्या अतिक्रमण धारकांना मोबाईलने टिप्स देतात, अशी तक्रार पोलीस निरिक्षकांनीच केली आहे. त्यामुळे या पथकाच्या कारवाईवर शंका येवू लागल आहे. (प्रतिनिधी)प्रकरण गंभीर; आयुक्तांकडे तक्रारअतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी कन्हैया जयस्वाल हे कारवाईला निघण्यापूर्वीच अतिक्रमणधारकांना सजग करतात. हा प्रकार सेवा आणि शिस्तीला छेद देणारा आहे. पोलीस निरीक्षक खराबे यांनी ही माहिती प्रशासनाला दिली असून आयुक्त गुडेवार रजेवरुन परतले की त्यांच्या समोर ही वास्तविकता मांडली जाईल, असे पोलीस पथकाचे म्हणणे आहे.