शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
2
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
3
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
5
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
6
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
7
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
8
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
9
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
10
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
11
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
12
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
13
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
14
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
15
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
16
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
17
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
18
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
19
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
20
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक गुन्हे शाखेकडून जिल्हा बँकेची ‘झडती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती :  एका खासगी कंपनीत ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपोटी ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली देण्याच्या ...

ठळक मुद्देदस्तावेज जप्त, ३.३९ कोटी रुपये दलालीच्या तपासाला गती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :  एका खासगी कंपनीत ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपोटी ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली देण्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची झाडाझडती घेतली. तेथून गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आवश्यक दस्तावेज ताब्यात घेण्यात आले. 
जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या १५ जून रोजीच्या तक्रारीवरून बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच अधिकारी, कर्मचारी व सहा ब्रोकर्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी या  प्रकरणाचा तपास शहर कोतवाली पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. 
प्राथमिक चौकशीनंतर आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे सहकाऱ्यांसह शुक्रवारी ३.३० च्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पोहोचले. तेथे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश कोलवाडकर यांच्याशी चर्चा केली. बँकेतील अधिकारी नितीन दामले यांच्यासोबत बॅँकेच्या तळमजल्यावरील लेखा शाखेत जाऊन प्रकरणाशी संबंधित दस्तावेज तपासकामासाठी ताब्यात घेतले. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पोहोचल्याने बँकेत मोठी खळबळ उडाली. एक तास पोलीस पथक बँकेत होते. ३.३९ कोटी रुपये दलाली दिल्याने बँकेची फसवणूक झाली, असे तक्रारीत नमूद आहे.

अटकसत्र सुरू होण्याची शक्यता
शुक्रवारी या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आवश्यक दस्ताऐवज ताब्यात घेण्यात आला. निरीक्षण व अभ्यासाअंती लवकरच अटकसत्र सुरू होण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविली. 

 

टॅग्स :Policeपोलिसbankबँक