शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:12 IST

अमरावती : सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन आदी बाबी सहाय्यभूत ठरत आहे. त्यावर शेतकरी ...

अमरावती : सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन आदी बाबी सहाय्यभूत ठरत आहे. त्यावर शेतकरी बांधवांनी भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी केले.

सोयाबीन बियाणे नाजूक असल्याने व तीन वर्षांत पीक काढणीच्या वेळेत आलेल्या संततधार पावसाचा सोयाबीन पिकाच्या बियाणे उगवणक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होऊन बियाण्याची उगवण न झाल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:चे घरगुती बियाणे ठेवणे व बियाणांची उगवणक्षमता तपासूनच पेरणीसाठी ते वापरणे आवश्यक आहे. रासायनिक व जैविक बीजप्रक्रियेचा सोयाबीन बियाण्याच्या उगवणक्षमतेवर चांगला परिणाम होतो. मात्र, सोयाबीन बियाणे कवच नाजूक असल्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने बीज प्रक्रिया करून तदनंतरच बियाणांचा पेरणीसाठी वापर करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

सोयाबीन पिकाच्या उत्पादनवाढीमध्ये पीक व्यवस्थापनातील लागवड तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे. पीक धनतेसाठी बी.बी.एफ.तंत्रज्ञानाचा अवलंब, टोकन पद्धतीत पेरणी केल्यास मूलस्थानी जलसंधारणामुळे पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पादनात वृद्धी होते. तसेच यामुळे पेरणीसाठी बियाणे मात्रा कमी लागत असल्याने उत्पादन खर्चात बचत होते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.

बॉक्स

खताचा अनावश्यक वापर टाळा

सोयाबीन पिकावर आवश्यक खत मात्रा बहुतांशी पेरणीच्या वेळी देण्यात येतात. त्यामुळे आवश्यक खते शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याबाबत नियोजन करावे. सोयाबीन पिकावर चक्री भुंगा, खोडमाशी, पाने खाणाऱ्या अळ्या या प्रमुख किडींचा व शेंग करपा, तांबेरा व मोझॅक या प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. कृषी विभागाच्या सल्ल्याने नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

बॉक्स

प्रथ्येक टप्प्यावर व्यवस्स्थापन महत्त्वाचे

कृषी विभागामार्फत सोयाबीन बियाणे तयार करणे, बीज प्रक्रिया, पीक व खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन आदीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याव्दारे शेतकऱ्यांनी पीक पध्दती व सोयाबीन बियाणे व अनुषंगिक बाबींसंदर्भात मार्गदर्शन घ्यावे. सोयाबीन उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक ठरणाऱ्या उपरोक्त बाबींचा शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.