शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना पावती न देताच अंत्योदय योजनेच्या धान्याचे वाटप

By admin | Updated: October 16, 2015 00:47 IST

तालुक्यात ग्रामीण भागात १३४ तर शहरात १० स्वस्त धान्य वितरकांची दुकाने आहेत.

भ्रष्टाचार : पुरवठा विभागाची बघ्याची भूमिकाउमेश होले दर्यापूरतालुक्यात ग्रामीण भागात १३४ तर शहरात १० स्वस्त धान्य वितरकांची दुकाने आहेत. परंतु काही दुकानदार शिधापत्रिकाधारकांना माल विक्रीच्या पावत्या न देताच विक्री करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामीण भागात व शहरात अन्न सुरक्षा योजनेचे ९६ हजार ४२४ लाभार्थी आहेत. या योजनेंतर्गत प्रती व्यक्ती ५ किलो धान्य देणे अपेक्षित आहे. यामध्ये २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ देण्यात येते. आॅगस्ट महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांसाठी १३८१ क्विंटल धान्य विभागाला प्राप्त झाला व लाभार्थ्यांना वितरित झाल्याचे बोलले जात आहे. परंतु सप्टेंबरमध्ये या योजनेच्या गहू, तांदळाचा तुटवडा असल्यामुळे व मालच न प्राप्त झाल्याने आॅगस्टमधील उरलेला २८२ क्विंटल गहू व ८६५ क्विंटल तांदूळ वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. दिवाळी, दसरा तोंडावर असताना गरिबांच्या घरात धान्य नाही, हा प्रकार गंभीर आहे. वडनेरगंगाई येथील एका लाभार्थ्याने तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे तशी तक्रार केली आहे. लाभार्थ्यांना पावती मिळत नसल्यामुळे परस्परच हे धान्य दुकानदार पावत्या लिहून घेतात व लाखो रुपयांचा गौरखधंदा सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र या प्रकाराला तालुका पुरवठा अधिकारी बी.एन. राठोड यांचे अभय असल्याचे समजते. त्यांनी दोन वर्षांत ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदारांची तपासणी केली नाही. पुरवठा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुये गरीबांचा गहू, तांदूळ काही स्वस्त धान्य दुकानदारांच्या घश्यात जात आहे.