शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

माहिती न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई

By admin | Updated: June 10, 2014 23:48 IST

फक्त प्रथम नियुक्तीच्यावेळी मत्ता व दायित्वे याची विवरण पत्र सादर करण्यात येत होते. परंतु अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय खात्यात नोकरी मिळाल्यानंतर अल्पावधीतच त्याच्या मालमत्तेत वाढ

अमरावती : फक्त प्रथम नियुक्तीच्यावेळी मत्ता व दायित्वे याची विवरण पत्र सादर करण्यात येत होते. परंतु अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय खात्यात नोकरी मिळाल्यानंतर अल्पावधीतच त्याच्या मालमत्तेत वाढ झाल्याचे शासनाच्याही निदर्शनास आले आहे. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील आकडेवारीनुसार यामध्ये दरवर्षी दुपटीने वाढ होत असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर यापुढे शासनाच्या विविध यंत्रणेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना ३१ मेपूर्वी दरवर्षी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मालमत्तेचे विवरण द्यावे लागणार आहे. हे विवरण सीलबंद पाकिटात संबंधित विभाग प्रमुखाकडे गोपनियरित्या ठेवण्यात येणार असून एखाद्या कर्मचाऱ्याची मालमत्तेसंदर्भात गंभीर स्वरुपाची तक्रार आल्यास ही गोपनिय माहिती उपयोगात आणल्या जाणार आहे.
पदोन्नतीनाही मिळणार ब्रेक
वार्षिक मालमत्ता विवरण पत्रे सादर करणे ही राज्य शासनामधील सर्व टप्प्यांवरील पदोन्नती, आश्वासित योजनेंतर्गतच्या पदोन्नती, प्रतिनियुक्ती, विदेश दौरा यासाठी पूर्वअट म्हणून विहित करण्यात येत आहे. परिणामी कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यास आश्वासित व नियमित पदोन्नतीचा लाभ देण्यापूर्वी किंवा प्रतिनियुक्तीस अनुमती देण्यापूर्वी तसेच कार्यालयीन विदेश दौऱ्यास अनुमती देण्यापूर्वी त्याने ३१ मार्च रोजीच मालमत्तेचे विवरण पत्र सादर केले नसल्यास अशांना पदोन्नती व आश्वासित योजनेतील पदोन्नती देण्यात येणार नाही. या शासन निर्णयात मात्र गट ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. हे कर्मचारी वगळता इतर सर्व कर्मचाऱ्यांना मालमत्तेचे विवरण सादर करणे बंधनकारक आहे. शासनाने २ जून रोजी यासंदर्भात सर्वच शासकीय कार्यालयांना परिपत्रक जारी केले असून यावर्षी ३० जूनपर्यंत ही माहिती सादर करणे कर्मचाऱ्यांना आवश्यक आहे.