तालुक्यातील नाथबांधवांचा धर्मनाथ बीज कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:17 IST2021-02-17T04:17:38+5:302021-02-17T04:17:38+5:30

चांदूर बाजार : तालुक्यातील शिरजगाव बंड ग्रामपंचायत अंतर्गत अनसूयामाता मंदिर परिसरालगत नवनाथ मंदिराच्या नियोजित जागेवर गोरक्षनाथांचा धर्मनाथ बीज ...

Dharmanath seed program of Nath brothers in the taluka | तालुक्यातील नाथबांधवांचा धर्मनाथ बीज कार्यक्रम

तालुक्यातील नाथबांधवांचा धर्मनाथ बीज कार्यक्रम

चांदूर बाजार : तालुक्यातील शिरजगाव बंड ग्रामपंचायत अंतर्गत अनसूयामाता मंदिर परिसरालगत नवनाथ मंदिराच्या नियोजित जागेवर गोरक्षनाथांचा धर्मनाथ बीज सोहळा १३ फेब्रुवारीला पार पडला. श्री नवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट (चांदूर बाजार) च्या विश्वस्त मंडळाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी नाथ समाजाच्या सभागृहाला १० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री नवनाथ चॉरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी होते. सत्कारमूर्ती जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, तर प्रमुख अतिथी म्हणून शिरजगाव बंड ग्रामपंचायतीचे सदस्य भास्कर हिरडे, रंगराव मानापुरे, विशाल बेले, केशरबाई पुनकर, कलाबाई चिंचोले, सारिका बर्वे, पायल रावळे, संगीता हिरडे यांच्यासह तळवेल, जवळा, चांदूर बाजार, ब्राम्हणवाडा थडी, सुरळी, कुरणखेड, घाटलाडकी, विरूळ पूर्णा, आसेगाव, परसोडा, विचोरी, रामा, साऊर, काकडा आदी गावांतील समाजबांधव उपस्थित होते. धर्मबीज सोहळा यशस्वी होण्यासाठी नीलेश बोंडसे, रवींद्र सौदागरे, अमित वानखडे, रामेश्वर हिरडे, नारायण वाडेकर, निरंजन सुरंदसे, बाळू पवार, राजाभाऊ वानखडे, नितीन ब्राम्हणकर, रामदास बोंडसे, तुळशीराम तिहिले, सचिन हिरडे, गजानन हिंगणकार, शाम हिरडे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Dharmanath seed program of Nath brothers in the taluka