शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित वस्त्यांमधील विकासकामे मार्गी लावा

By admin | Updated: July 9, 2014 23:14 IST

अमरावती-बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती वस्ती विकासाची ४ कोटी ४७ लक्ष रूपयांची अतिरिक्त अनुदानाच्या वितरित रकमेतून विकासाची कामे तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अमरावती : अमरावती-बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती वस्ती विकासाची ४ कोटी ४७ लक्ष रूपयांची अतिरिक्त अनुदानाच्या वितरित रकमेतून विकासाची कामे तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील नागरी क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या सामाजिक आर्थिक, शैत्रणिक व सांस्कृतिक उन्नतीकरिता तसेच मूलभूत गरजा भागविण्यासाठी १४ नोव्हेंबर २००८ च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुदानाच्या रकमेत राज्य शासनाने वाढ केली आहे. विशेष घटक लोकसंख्येच्या कल्याणासाठी सन १९९५-९६ या आर्थिक वर्षापासून नागरी अनुसूचित जाती वस्ती विकास योजना सुुरू केली. राज्यातील काही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुसूचित जाती प्रभागातील नागरिकांना सोई-सुविधा पुरविण्यासाठी शासनस्तरावर अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्याप्रमाणे अमरावती-बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अमरावती महानगर पालिका क्षेत्रात अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये ४९ विकास कामे प्रस्तावित करण्यात आली होती. जुलै २०१३ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पित केलेल्या राज्यातील सर्व महानगर पालिकांना ८२ कोटी ३८ लक्ष ७६ हजारांच्या अतिरिक्त अनुदानातून अमरावती-बडनेरा मतदारसंघातील अमरावती महापालिका क्षेत्रात अनुसूचित जातीच्या वस्त्यांमधील ४९ विकास कामांना ४ कोटी ४७ लक्ष रूपयांचा निधी वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. हा निधीदेखील जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पुरवणी मागणीद्वारे मंजूर केलेल्या अतिरिक्त वितरित अनुदानातून प्रशांतनगर येथील सभामंडपासाठी १० लक्ष रूपये, रमाबाई आंबेडकरनगर येथील सांस्कृतिक भवनासाठी १५ लक्ष रूपये, नवसारी जेतवन बौध्द विहार सौंदर्यीकरणासाठी ५ लक्ष रूपये, शेगाव येथील रत्नदीप कॉलनी, बगिचा सौंदर्यीकरणासाठी १० लाख रूपये, तपोवन-लुंबिनी कॉलनी, आनंदनगर, हनुमाननगर, चवरेनगर, निंभोरा, यशोदानगर, संजय गांधीनगर, वडरपुरा, फ्रेजरपुरा येथील सिध्दार्थ क्रीडा मंडळानजीकच्या समाज मंदिरासाठी प्रत्येकी १० लाख रूपये तर महादेवखोरी, जेवडनगर, जनकनगर, संतोषीनगर, शिवाजीनगर, माता फैल, महाजनपुरा आणि प्रशांतनगर समाज मंदिरासाठी प्रत्येकी ८० लक्ष रूपये अतिरिक्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. हे अनुदान वितरित करण्यात आलेले असताना अद्यापपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. त्यामुळे ही विकासकामे रखडलेली आहेत. अमरावती-बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती वस्ती विकासाच्या ४ कोटी ४७ लक्ष रूपयांच्या या लोकोपयोगी सार्वजनिक विधायक कामांना विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी प्रशासकीय मान्यता देऊन तत्काळ प्रस्तावित विकास कामे सुरू करावीत, अशी मागणी भीमशक्ती संघटनेचे विदर्भ प्रदेश सरचिटणीस पंकज मेश्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. शासन अनुसूचित जातीकरिता अनेक योजना राबविते. मात्र, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने त्या अपूर्ण राहतात.