शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन, कपाशीच्या पेऱ्यात घट

By admin | Updated: August 10, 2015 00:07 IST

सोयाबीन हे नगदी पैसा मिळवून देणारे पीक असल्याने तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाकडे वळला आहे.

पाऊस लांबल्याचा परिणाम : अनेकांच्या पिकाला आली मोड

नांदगाव खंडेश्वर : सोयाबीन हे नगदी पैसा मिळवून देणारे पीक असल्याने तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाकडे वळला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली असून ४८ हजार २११ हेक्टर तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र आहे. पर्यायाने कापसाचे क्षेत्रामध्ये कमालीची घट झाली असून फक्त ४ हजार ४११ हेक्टरवर कपासीचा पेरा आहे. सुरवातीला जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये पेरणीला सुरवात केली. नंतर पावसाने एक महिना दडी मारली असल्याने काही शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. या एक महिन्याचे उघाडीमध्ये निघालेले बियाण्याचे अंकुर करपायला सुरुवात झाली होती. परंतु २० ते २३ जुलैदरम्यान तालुक्यात पुन्हा हलका स्वरुपाचा पाऊस झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आणि खोळंबलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी उरकून घेतल्या असल्याने तालुक्यात दोन टप्प्यामध्ये पेरणी झाली. आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शेतकरी आनंदला. तालुक्यात ६ आॅगस्टपर्यंत ४०० मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षीच्या तुलनेत तो जास्त आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत फक्त ३६८ मिमी पावसाची नोंद आहे. एक महिन्याचे विश्रांतीनंतर आॅगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसाने विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असून नदी-नाल्यांना सुद्धा पाणी आले. अजून दोन महिने पावसाचा कालावधी असल्याने उत्तरार्धात तरी पाऊस सरासरी भरून काढेल या आशेवर शेतकरी आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने शेतीच्या कामाला वेग आला असून सोयाबीनवर कीटकनाशकाच्या फवारणीला शेतकरी गुंतला असून दुसऱ्या टप्प्यामध्ये पेरणी झालेल्या क्षेत्रावर तण नाशकाची फवारणी, निंदन डवरणी या कामाची धूम आहे. तालुक्यात ४८२११ हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी ४ हजारने वाढ झाली असून कापसाचे क्षेत्र मात्र सरासरी ५ हजार हेक्टरने घटले आहे. त्याचबरोबर तूर पिकाचे क्षेत्रसुद्धा वाढले आहे. सोयाबीन ४८२११ हेक्टर, कपासी ४४११ हेक्टर, तूर ९३९५ हेक्टर, मूग २७७ हेक्टर, उडीद १२७ हेक्टर, संकरीत ज्वारी १७ हेक्टर क्षेत्र असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी भागवत आणि पं. स. चे कृषी अधिकारी सावळे यांनी दिली. नुकताच झालेला पाऊस समाधानकारक असून पिकाला पोषक असल्याने शेतकरी आनंदी आहे. परंतु शेतीच्या जुगारात निसर्गासोबतच्या खेळात शेवटी शेतकरी कितपत यशस्वी होतो हे मात्र येणारा काळच सांगू शकेल. (शहर प्रतिनिधी)