विनोद शिवकुमारच्या जामिनावर १९ एप्रिल रोजी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:13 IST2021-04-16T04:13:16+5:302021-04-16T04:13:16+5:30

परतवाडा : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारच्या जामिनावर न्यायालयाला १५ एप्रिलऐवजी आता ...

Decision on Vinod Shivkumar's bail on April 19 | विनोद शिवकुमारच्या जामिनावर १९ एप्रिल रोजी निर्णय

विनोद शिवकुमारच्या जामिनावर १९ एप्रिल रोजी निर्णय

परतवाडा : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारच्या जामिनावर न्यायालयाला १५ एप्रिलऐवजी आता १९ एप्रिल रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील न्यायालय १५ व १६ रोजी बंद ठेवण्याचे आदेश आल्याने न्यायालय बंद आहे.

गुगामल वन्यजीव विभागाचा उपवनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार याला दीपाली चव्हाण यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी पळून जात असताना नागपूर रेल्वे स्टेशनहूून २७ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याला धारणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पूर्वी दोन व नंतर एक अशा तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याची ३० मार्च रोजी पंधरा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून विनोद शिवकुमार अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे. जामिनासाठी वकिलांमार्फत अचलपूर येथील न्यायालयात शुक्रवारी अर्ज सादर केला. त्यावर आता १९ एप्रिल रोजी अचलपूर येथील तदर्थ व जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक १ एस. के. मुंगीनवार यांच्या न्यायालयात सरकारी अभियोक्ता व तपासणी अधिकारी यांची बाजू ऐकून घेतल्यावर निर्णय होणार आहे.

Web Title: Decision on Vinod Shivkumar's bail on April 19