शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना उपचारासाठी भूमकाकडे गेलेल्या महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:12 IST

लोकमत विशेष नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह निघालेली ४५ वर्षीय महिला दवाखान्यातील औषधे सोडून उपचारासाठी ...

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह निघालेली ४५ वर्षीय महिला दवाखान्यातील औषधे सोडून उपचारासाठी नजीकच्या गावातील भूमकाकडे गेली. गुरुवारी सायंकाळी प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला. मृतदेह सेमाडोह गावी आणण्यात आला. पॉझिटिव्ह असल्याने प्रशासनाने रात्री अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, नातेवाइकांनी नकार दिला. शुक्रवारी दुपारी २ वाजता तब्बल २० तासांनंतर महिलेवर नातेवाइकांनी अखेर अंत्यसंस्कार केले. या घटनेने मेळघाटात खळबळ उडाली आहे

मेळघाटातील आदिवासी सर्दी, खोकला, ताप ते प्रत्येक आजार आणि शुभकार्यासाठी भूमका (मांत्रिक) कडे उपचारासाठी जातात. लहान मुलांच्या अंगावर डम्मा (गरम विळ्याचे चटके) देण्यासह विविध अघोरी पद्धत अवलंबविली जात असल्याचे ‘लोकमत’ने अनेकदा प्रकाशित केले.

सूत्रांनुसार, सेमाडोह येथील ४५ वर्षीय विधवा महिलेची तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल १२ एप्रिल रोजी १०.५० वाजता डॉक्टरांनी दिला. त्यानुसार सदर महिलेला होमक्वारंटाईन करण्यात आले.

-----------------

भूमकाकडे ठोकली धूम

तपासणी अहवालात पॉझिटिव्ह असला तरी आपणास काहीच झालेले नाही, असे तिने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यंत्रणेला सुनावून तिने उपचारासाठी सेमाडोहपासून दहा किमी अंतरावरील भवई गाव गाठले. तेथे नातेवाईकांकडे जाऊन कोरोना व तिला असलेल्या आजारावर भूमकाकडे उपचार सुरू केला. या दरम्यान आजार बळावल्याने गुरुवारी तिचा मृत्यू झाला

------------------

रात्रभर मृतदेह पडून

महिलेचा मृतदेह गुरुवारी रात्री ८ वाजता सेमाडोह येथील घरी आणण्यात आला. गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉ. महेश कूर्तकोटी, जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड, सरपंच अनिता चिमोटे, ग्रामसेवक सुरेंद्र चिकटे यांना पाचारण केले. अंत्यसंस्कार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पीईपी किट व साहित्य घेऊन तयार होती. सर्वांनी समजाविले तरी नातेवाईक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांच्या हट्टामुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेला मृतदेह रात्रभर घरीच ठेवण्यात आला. अखेर शुक्रवारी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

-------------

सेमाडोह येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू शुक्रवारी भवई गावात झाला. उपचारासाठी ती मांत्रिकाकडे गेली होती. अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांनी गुरुवारी रात्री प्रचंड विरोध दर्शविला.

- माया माने, तहसीलदार, चिखलदरा

----------़

पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पीईपी किट घेऊन आरोग्य कर्मचारी स्थानिक प्रतिनिधी गुरुवारी रात्रभर त्यांच्या नातेवाइकांना समजून घातली. मात्र, त्यांनी कुणाचेच ऐकले नाही. महिलादेखील औषध उपचार सुरू असताना भूमकाकडे उपचारासाठी गेली व तेथे तिचा मृत्यू झाला.

- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा