शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात हिंदू, मुस्लिम एकतेचे दर्शन

By admin | Updated: October 13, 2016 00:23 IST

कारागृह हे बंदीशाळा असले तरी ते विविध जाती, धर्म, पंथ, समाजातील गुन्हेगारी बंदीस्तांचे एक छोटे गाव आहे.

मोहर्रम, नवदुर्गोत्सव साजरा : विसर्जन मिरवणुकीने परिसर दणाणलाअमरावती : कारागृह हे बंदीशाळा असले तरी ते विविध जाती, धर्म, पंथ, समाजातील गुन्हेगारी बंदीस्तांचे एक छोटे गाव आहे. येथे सण- उत्सव जाती, धर्माच्या सीमा ओलांडून साजरे केले जातात. याच अनुषंगाने गुरुवारी मोहर्रम आणि नवदुर्गोत्सव विसर्जन मोठ्या थाटात साजरा करण्यात आले. यावेळी हिंदू- मुस्लिम बंदीजन एकत्र आल्याने कारागृहात सामाजिक एकतेचे दर्शन दिसून आले.अधीक्षक भाईदास ढोले यांनी कारागृहाचा कारभार हाती घेतल्यानंतर विविध उपक्रम, उत्सव साजरे करण्यात पुढाकार घेतला आहे. कारागृहात बंदीस्त असलेल्या कैद्यांच्या मनात न्युनगंड किंवा नैराश्याची भावना निर्माण होऊ नये, यासाठी राष्ट्रीय उत्सव, सण, भारतीय संस्कृती जोपासली जात आहे. नवरात्रौत्सवात कारागृहामध्ये पुनर्वसन जन सेवा दुर्गा मंडळ स्थापन करण्यात आले होते. कारागृहाच्या नियमावलीनुसार हिंदू धर्माच्या परंपरेची जोपासना करण्यात आली. सलग नऊ दिवस दुर्गेची आरती व पूजा पाठ करुन बंदीजनांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. गुरुवारी मोहरम उत्सवानिमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी कारागृहात सुख, शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच माता दुर्गेची कारागृहात मिरवणूक काढण्यात आली. दृष्ट प्रवृत्तीचा नायनाट व्हावा, यासाठी मनोकामना करण्यात आली. यावेळी प्रतिकात्मक दुर्गा देवी, राक्षस, वाघ आदी वेशभुषा परिधान करुन कैदी बांधवांनी मिरवणूक काढली. मनुष्यातील क्रोध, काम, वासना, लोभ, माया व व्देष हे नायनाट व्हावे, हा मिरवणुकीमागील उद्देश असल्याचे कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी सांगीतले. ही मिरवणूक सर्व बराकीतून जात असताना कैदी बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे चित्र अनुभवता आले. हिंदू, मुस्लिम कैदी सहभागी होऊन ‘हम सब एक है’चा नारा दिला. यावेळी वरिष्ठ तुरुंगाधिकारी पी. एस. भुसारे, मंडल तुरुंगाधिकारी बी. एस. सदाशीव, राजेंद्र ठाकरे, एम. एस. चव्हाण, वैद्यकीय अधिकारी संजय गणोकर, सुभेदार लांडे, संजय इजाठे आदी उपस्थित होते. मिरवणुकीत कैद्यांनी बाजवल्या विविध भूमिकामिरवणुकीत संतोष नरोट यांनी व्यवस्थापकाची भूमिका बजावली. रामेश्वर उजेड (राक्षस), संदेराज कपाटे (देवी), नरेंद्र राठोड (वाघ), दिनकर नरोट (अध्यक्ष), लक्ष्मण शिंदे व मनोहर शेडकर (चोपदार) दिनेश तिवारी (परशुराम), श्रीराम वानखडे व लक्ष्मण इंगोले (ढोलक वादक), गजानन इंगळे, धनराज सुरुसे ( नाल वादक), बंटी उप्पलवार, रमेश नरोट ( पालखी वाहक) वामन कड (मृदुंग वादक) आदींनी विविध भूमिका बजावल्यात.