शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरचा स्फोट; दोन कुटुंब उघड्यावर

By admin | Updated: March 8, 2017 00:03 IST

सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटानंतर दोन घरांची राखरांगोळी झाली. दोन्ही कुटुंबीय उघड्यावर आलेत.

भातकुली तालुक्याच्या विर्शी येथील घटना   शासनाकडून सानुग्रह अनुदान    गाईचे वासरू दगावलेअमरावती : सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटानंतर दोन घरांची राखरांगोळी झाली. दोन्ही कुटुंबीय उघड्यावर आलेत. ही घटना सोमवारी भातकुली तालुक्यातील विर्शी गावात घडली. या आगीत झालेल्या नुकसानीबाबत दोन्ही कुटुंबीयांना शासनाकडून सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. विर्शी येथील रहिवासी बाबुलाल फत्तुजी हिवराळे यांच्या घरातील सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे सोमवारी सायंकाळी ६ वाजता अचानक आगीचा भडका उडाला. वरिष्ठांकडे अहवालअमरावती : यावेळी झालेल्या सिलिंडर स्फोटात हिवराळे यांच्या घरासह शेजारी राहणारे महादेव कालुजी राजने यांच्या घर सुध्दा जळुन खाक झाले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, दोन्ही घरे जळुन खाक झाल्यामुळे त्यांची कुटुंबीय उघड्यावर आले होते. या आगीत हिवराळे यांच्या घराच्या आवारातील गोठ्यात असणारे पाच महिन्याचे वासरू सुध्दा दगावले. या घटनेच्या माहितीवरून जिल्हाधिकारी किरण गित्ते व उपविभागीय अधिकारी ओ.पी.लथाड यांच्या मार्गदर्शनात तहसिलदार वैशाली पाथरे, नायब तहसिलदार अशोक काळीवकर व प्रविण ढोले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यामध्ये दोन्ही घराचे ३ लाख ८० हजारांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तहसिलदारांनी अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यामुळे तत्काळ दोन्ही बेघर कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान म्हणून मदत देण्यात आली.सिलिंडरचा भडका; ‘त्या’ वृद्धेचा मृत्यूरवीनगर येथील घटना आतापर्यंत १२ घटनांमध्ये शहरात दोन बळी सुरक्षा संबंधी मार्गदर्शनाचा अभावअमरावती : सिलिंडरच्या भडक्याने गंभीररीत्या जळालेल्या एका वृद्ध महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. कांता मनोहर भोगे (७०,रा. रविनगर) असे मृताचे नाव आहे. कांता भोगे यांना २० जानेवारी रोजी ४० टक्के जळालेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या १५ महिन्यात सिलिंडरच्या भडक्याने दोन जणांचे बळी गेले आहेत. गॅस सिलिंडरच्या सुरक्षेच्या दृष्टीने वितरक एजन्सीमार्फत ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करण्यात येते. मात्र, दरम्यानच्या काळ्यात सिलिंडर ग्राहकांना मार्गदर्शनाचा अभाव दिसून आला. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या भडका उडाल्याच्या अनेक घटना उघड झाल्या. मागील वर्षात २२ ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तब्बल सात जण भाजल्या गेले होते. जानेवारी २०१७ मध्येही शहरात सिलिंडर भडक्याच्या दोन घडना घडल्या. संजीवनी कॉलनीतील झालेल्या सिलिंडरच्या भडक्यात दोन विद्यार्थिनी गंभीररीत्या जळाल्या. त्यापैकी एकीचा मृत्यू झाला. तसेच २० जानेवारी रोजी रविनगरातील रहिवासी कांता भोगे यांच्या घरातील सिलिंडर भडका उडाला. त्यामध्ये कांता भोगे यांच्यासह शीतल भोगे (२७) व शौनक भोगे (५) हे तिघे भाजल्या गेले. तसेच या भडक्यात त्यांच्या घरातील कारसुद्धा जळून खाक झाली. तिघांचाही उपचार खासगी रुग्णालयात सुरु होता. दरम्यान मंगळवारी कांता भोगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कांता भोगे यांच्या पश्चात एक मुलगा व चार मुली आहेत. (प्रतिनिधी)