शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनाला सायबर क्राईम लॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 01:13 IST

सायबर गुन्ह्यांवर अंकूश ठेवण्याच्या उद्देशाने राज्यभरात पोलीस विभागात सायबर क्राईम लॅबची स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे.

आयजींचे निर्देश : सायबर सेलचे काम सुरु अमरावती : सायबर गुन्ह्यांवर अंकूश ठेवण्याच्या उद्देशाने राज्यभरात पोलीस विभागात सायबर क्राईम लॅबची स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार येत्या स्वातंत्र्य दिनापासून ग्रामीण पोलिस अधीक्षक , पोलिस आयुक्तालयात सायबर क्राईम लॅब कार्यान्वित होणार आहे. या लॅबमुळे फेसबूक, व्हॉटसअ‍ॅपसह इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास व गुन्हेगारांचा शोध घेण्यास मोठी मदत मिळणार आहे. आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे नागरिकांना बहूतांश दैनदिन व्यवहार सोयीचे झाले आहे. मात्र, याच माध्यमातून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही आढळून आले आहे. हॅकिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूकीचे प्रकार सातत्याने उघड होत आहेत. महिनाभराची प्रतीक्षा अमरावती : सोशल मिडीयाच्या माध्यमातून आक्षेपार्ह छायाचित्रे, प्रक्षोभक संदेश अपलोड करून सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न समाजकंटक करीत असतात. राज्यात मुंबईत एकच सायबर लॅब असून तेथे कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे अनेक गुन्ह्यांचे तपास प्रलंबित राहतात. त्यादृष्टीने सायबर क्राईमचा तपास करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शहरात एक सायबर क्राईम लॅब उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी गेल्या वर्षी केली होती. ८ फेब्रुवारी २०१६ रोजी यासंदर्भातील अध्यादेश निघाला असून सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालये आणि पोलीस आयुक्तालयांमध्ये सायबर क्राईम लॅबची सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या १५ आॅगस्ट रोजी या लॅबची सुरुवात होणार असल्यामुळे स्वतंत्र कक्ष, अत्याधुनिक साहित्य आणि मनुष्यबळाची जुळवाजुळव करण्याची तयारी सुरु झाली आहे. लॅबसाठी उच्च प्रतिचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर तसेच अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर केला जाणार आहे.