शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

करबुडव्या सहा खदानी करणार सील

By admin | Updated: March 29, 2016 00:09 IST

अतिरिक्त उत्खनन करुन गौण खनिज रॉयल्टीची रक्कम न भरणाऱ्या सहा खदानी मंगळवारी २९ मार्च रोजी सील केल्या जाणार आहेत.

दोन कोटी थकीत : महसूल विभागाने नोटीस बजावलीअमरावती : अतिरिक्त उत्खनन करुन गौण खनिज रॉयल्टीची रक्कम न भरणाऱ्या सहा खदानी मंगळवारी २९ मार्च रोजी सील केल्या जाणार आहेत. त्याअनुषंगाने महसूल विभागाने खदान संचालकांना नोटीस बजावल्या असून करापोटी त्यांच्याकडे दोन कोटी रुपये थकीत असल्याची माहिती आहे.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशानुसार महसूल करबुडव्यांविरुद्ध ठोस कारवाई केली जात आहे. अमरावती तहसील अंतर्गत सहा खदानींकडे रॉयल्टीचे दोन कोटी रुपये थकीत आहेत. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियम) नियम २०१३ चे उपनियम ३३ नुसार खदान संचालकांना वारंवार नोटीस बजावून थकीत रॉयल्टीची रक्कम अदा करण्याबाबत महसूल विभागाने कळविले आहे. मात्र, खदान संचालकांनी महसूल विभागाच्या या नोटीसला फार गांभीर्याने घेतले नाही. २६ मार्च रोजी महसूल विभागाने खदान संचालकांना नोटीस बजावली असताना रॉयल्टीची रक्कम भरली नाही. परिणामी २९ मार्च रोजी खदानी सील केल्या जातील. ही धडक कारवाई करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. खदानी सील करताना पाणी, वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. खदान क्र. २०२, ६८, ८१, १६८, १९४ व ६९ यांच्यावर ही कारवाई केली जाईल. त्यानुसार महसूल विभागाने तयारी केली असून मंगळवारी खदान सील करुन त्या ताब्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.खदान सील करण्यासाठी यांना बजावल्या नोटीसमहसूल विभागाकडून मंगळवारी सहा खदानी सील केल्या जाणार आहेत. यात मासोद येथील अंबादास शेळके, सुभाष तायडे, विनोद मुधोळकर तर परसोडा येथील सचिन राजुरकर, शेवती येथील नीलिमा पिंपळकर व सचिन राजुरकर आणि उदखेड येथील मनोज कपूर या खदान मालकांचा समावेश आहे.बडनेऱ्यात दोन वीट भट्ट्यांवर कारवाईबडनेरा कोंडेश्वर मार्गालगतच्या दोन वीट भट्ट्यांवर रॉयल्टी थकीत असल्याप्रकरणी महसूल विभागाने सोमवारी कारवाई केली. वासेवाय आणि राजेंद्र दारोकार यांच्या वीट भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. थकित रक्कम भरण्यात आली नाही तर साहित्य जप्त केले जाईल, असे महसूल विभागाने सांगितले. महसूल नियमानुसार रॉयल्टीची दोन कोटी रुपये रक्कम थकीत असल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. खदान मालकांना थकीत रक्कम भरण्यासाठी वारंवार नोटीस सुद्धा दिल्या आहेत. मात्र, काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे आता खदानी सील केल्या जातील.- सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती.