सीआरपीएफ जवानाचा अल्पशा आजाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:15 IST2021-02-25T04:15:04+5:302021-02-25T04:15:04+5:30

जरूड - सीआरपीएफमध्ये कार्यरत संदीप मधुकर ब्राम्हणे (३७, रा. समतानगर, वरूड) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बुधवारी सायंकाळी ५ ...

CRPF jawan dies of Alpsha disease | सीआरपीएफ जवानाचा अल्पशा आजाराने मृत्यू

सीआरपीएफ जवानाचा अल्पशा आजाराने मृत्यू

जरूड - सीआरपीएफमध्ये कार्यरत संदीप मधुकर ब्राम्हणे (३७, रा. समतानगर, वरूड) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मूळ गावी जरूड येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संदीप ब्राम्हणे हे १७ वर्षांपासून ओडिशा येथे नियुक्त होते. काही दिवसांपूर्वी सेवेत असतानाच त्यांना आजार जडला. त्या आजाराचे रूपांतर कावीळ आजारामध्ये झाले. कुटुंबीयांनी त्यांना परत बोलावून नागपूर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृतीत सुधार न होता ती खालावतच गेली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर १ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. जरूड येथील सरपंच तथा माजी सैनिक सुधाकर मानकर व ग्रामवासीयांनी संदीप यांच्या पुढाकाराने जरूड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे.

Web Title: CRPF jawan dies of Alpsha disease