शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची गर्दी

By admin | Updated: October 13, 2016 00:21 IST

जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या आरक्षण सोडतीनंतर खुल्या व नामाप्र वर्गाच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची गर्दी होत आहे.

निवडणूक : इच्छुकांच्या हालचालींना वेग अमरावती : जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या आरक्षण सोडतीनंतर खुल्या व नामाप्र वर्गाच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे यावेळी नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. त्यामुळे या पदासाठी दावेदारांची संख्याही अधिक आहे.त्यामुळे विविध राजकीय पक्षातील पुढाऱ्यांनी उमेदवारी निश्चित करण्यासाठी हालचालींची गती वाढविली आहे. नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणानुसार अचलपूर नामाप्र (स्त्री), अंजनगाव सुर्जी सर्वसाधारण, दर्यापूर सर्वसाधारण, वरूड व मोर्शी आणि चिखलदरा या तीन नगरपरिषदांचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण (स्त्री) प्रवर्गाकरिता आरक्षित आहे. चांदूररेल्वे व चांदूर बाजार (नामाप्र) येथील आरक्षण लक्षात घेता याठिकाणी इच्छुकांची गर्दी होणार आहे. यामध्ये केवळ शेंदुरजनाघाट नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातींकरिता राखिव आहे. त्यामुळे येथील अपवाद वगळता जिल्ह्यातील उर्वरित नगपरिषदेत आरक्षणामुळे उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.सर्वसाधारण व नामाप्रच्या वाट्याला एखादे महत्त्वाचे पद आरक्षणाच्या सोडतीत गेले तर आपुसकच सगळयांसाठी ती एक पर्वणी ठरते.राजकीय पक्षांची कसरतअमरावती : ही पर्वणी साधण्याचा प्रयत्न सर्वांकडून होत असल्यामुळे स्पर्धा वाढत आहे. युती किंवा आघाडी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसया प्रमुख पक्षांसह अन्य स्थानिक पक्ष व अपक्ष उमेदवारांची गर्दी असे थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र राहू शकते. सर्वसाधारण व नामाप्र यावर्गातील पुरूष आणि महिलांसाठी काही नगपरिषदांचे नगराध्यक्षपद आरक्षित असल्याने अस्तित्व सिद्ध करणारे निर्णयक्षम व सक्षम सुशिक्षित उमेदवार या पदावर दावा करण्यासाठी सिद्ध होतील, असे चित्र दिसून येत आहे. अनुसूचित जाती महिलांकरिता शेंदूरजनाघाट नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद आरक्षित असल्याने येथेही इच्छुकांची संख्या मोठी आहे. तरीही येथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी फारशी गर्दी होणार नाही. परंतु उर्वरित ठिकाणी मात्र उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी थेट मतदारांमधून निवडणूक होत आहे. अशातच जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांपैकी एका नगपरिषदेचा अपवाद वगळला तर नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण व नामाप्रसाठी आरक्षित असल्याने याठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे राजकीय पक्षाना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देताना मोठी कसरत करावी लागणार आहे.