शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे पिके संकटात

By admin | Updated: October 20, 2014 23:05 IST

विधानसभा निवडणूक संपताच वरुड तालुक्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरु झाले असून शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करुन पिकांचे ओलीत करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीही दखल घेत नाही.

वरुड : विधानसभा निवडणूक संपताच वरुड तालुक्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरु झाले असून शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करुन पिकांचे ओलीत करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीही दखल घेत नाही. कृषिपंपांचे भारनियमन वाढले असल्याने खरीप हंगामातील कपाशी, मिरचीसह संत्रा पिकेसुद्धा धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांना नियमित वीज देण्याची मागणी केली जात आहे.कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशा संकटाने शेतकरी पूर्णत: खचला आहे. संत्रा आंबिया बहरावर संत्रा उत्पादकांनी समाधान मानले. परंतु पावसाने एक महिन्यापासून दडी मारल्याने शेतातील कपाशी, मिरची, सोयाबीन, तूर सुकायला लागली तसेच संत्रा फळे गळू लागली आहे. नर्सरीमध्ये ेकेलेली जंभेरीची रोपटे सुकू लागली. विहिरीत पाणी आहे. परंतु वीज भारनियमनामुळे शेतकऱ्यांना ओलीत करता येत नाही. यासंदर्भात वीज वितरण कंपनीकडे अनेकवेळा तक्रारी करुनही दखल घेतली जात नाही. अभियंते म्हणतात, 'भारनियमनाचे अधिकार आमच्याकडे नाही' यामुळे शेतकऱ्यांनी जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील गाडेगाव, शेंदूरजनाघाट, पुसलासह आदी वीज कार्यालयांवर शेतकऱ्यांनी धडक देऊन तातडीने वीज भारनियमन कमी करण्याची मागणी केली होती. परंतु अद्यापही भारनियमन कमी झाले नाही. तालुक्यात कृषी पंपाकरिता असलेला वीजपुरवठा वारंवार खंडित असतो. भारनियमन वाढल्याने अनेकांना भरनियमनाचा फटका बसायला लागला आहे. काही भागांत विद्युत रोहित्रांत बिघाड तर काही भागांत वीजपुरवठा खंडित करावा अशी अवस्था असल्याने कपाशी, मिरची, संत्रा उत्पादन घटण्याची शक्यता आहे. वरुड तालुक्यात पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार हे निश्चित. एकीकडे निवडणुकीत कोट्यवधी रुपयांची उधळण तर दुसरीकडे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची च्ािंता आहे. वरुड तालुक्यात संत्रा, मिरची आणि कपाशी उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून डौलदार पिकांना ओलीत करण्याची गरज असताना विजेअभावी ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता असल्याने पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (प्रतिनिधी)