शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पेसा कायद्याचे उल्लंघन झाल्यास फौजदारी

By admin | Updated: May 28, 2016 00:13 IST

पेसा कायद्यांतर्गत पाच टक्के निधीचे शासकीय निर्णयानुसार अंमलबजावणी न करता स्वच्छेने अधिकाराचा दुुरुपयोग करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी करण्यात यावी.

धारणी : पेसा कायद्यांतर्गत पाच टक्के निधीचे शासकीय निर्णयानुसार अंमलबजावणी न करता स्वच्छेने अधिकाराचा दुुरुपयोग करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी करण्यात यावी. प्रसंगी आदिवासी निधीचा गैरवापर केल्यामुळे अ‍ॅट्रॉसिटीसुध्दा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विभागीय सचिव रमेश तोटे यांनी केली आहे.या मागणीचे निवेदन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी षणमृगराजन यांच्यामार्फत राज्यपालांकडे पाठविण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, आदिवासी विभागाचे प्रधान सचिव यांनासुध्दा देण्यात आले आहे. या निवेदनातून शासन निर्णयानुसार धारणी तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीसाठी पेसाअंतर्गत पाच टक्के निधी आदिवासी विभागाव्दारे तीन कोटी ३२ लाख रुपये देण्यात आले असल्याचे म्हटले आहे. सदर निधीचा उपयोग गाव विकासासाठी करण्यात आला आहे. सदर निधीचा वापर गाव विकासासाठी देण्यात आले होते. सन २०१५-१६ मध्ये दिलेल्या या निधीतून आरोग्य, शिक्षण, कुपोषण व संस्कृतिचे पारंपारिक जतन, जनजागृती अभियान या विषयांवर खर्च करण्याचे शासन निर्णयात तरतूद करण्यात आली. परंंतु गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांनी संगनमत करुन सरपंच व सदस्यांंना खोटी माहिती देऊन ई-लर्निंग, प्रोटीन पावडर, आर.ओ. मशिन खरेदी केल्याचा आरोप रमेश तोटे यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)