फेक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठविणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:01:12+5:30

अमरावती जिल्ह्यात पसरविल्या जात असलेल्या अशाच एका फेक मेसेजला ‘अमरावती कलेक्टरकडून सूचना’ असा मथळा असून, शेवटी ‘जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती’ असा उल्लेख आहे. कोरानाकाळात काय करावे आणि काय करू नये, कुठल्या वस्तू वापराव्यात आणि कुठल्या वापरू नये, यासंबंधीची माहिती त्या मेसेजमध्ये आहे.

Criminal charges against those who send fake WhatsApp messages | फेक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठविणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे

फेक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठविणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे

Next
ठळक मुद्देशोध सुरू : जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या पदनामाचा गैरवापर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाची दिशाभूल करणारे आणि अफवा पसरविणारे मेसेज सोशल मीडियाद्वारे पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न काही अपप्रवृत्तींकडून केला जात आहे. अशा व्यक्तींवर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
अमरावती जिल्ह्यात पसरविल्या जात असलेल्या अशाच एका फेक मेसेजला ‘अमरावती कलेक्टरकडून सूचना’ असा मथळा असून, शेवटी ‘जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती’ असा उल्लेख आहे. कोरानाकाळात काय करावे आणि काय करू नये, कुठल्या वस्तू वापराव्यात आणि कुठल्या वापरू नये, यासंबंधीची माहिती त्या मेसेजमध्ये आहे. त्यातील माहिती दिशाभूल करणारी आणि अशास्त्रीय आहे. 'तो' मेसेज जिल्हाधिकाऱ्यांनी वा जिल्हा माहिती कार्यालयाने जारी केला नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
प्रशासनाच्या नावाने दिशाभूल करणाऱ्यां व्यक्तींचा शोध पोलीस घेत असून त्यांच्यावर लवकरच फौजदारी कारवाई केली जाणार आहे. दिशाभूल करणारे, भीती निर्माण करणारे, घबराट पसरविणारे मेसेज नागरिकांनी फॉर्वर्ड करू नये. तोदेखील गुन्हा ठरतो. तसे मेसेज आढळल्यास प्रशासनाला त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

फेक मेसेजमध्ये काय?
कोरोना तिसऱ्या टप्प्यात जाणार असल्याचा उल्लेख करून वृत्तपत्र बंद करा, ब्रेड-पाव किंवा बेकरी साहित्य बंद करा, शेजाऱ्यांना येऊ देऊ नका, सर्वच गरजांसाठी गरम पाणी वापरा, अशा टिप्स त्यात दिल्या आहेत. त्याशिवाय आणखी बऱ्याच बाबी लिहिल्या आहेत. त्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे. मात्र, अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. ते फॉरवर्ड करू नका. समाज माध्यमांवर दिशाभूल करणारे, अफवा पसरविणारे मेसेज आल्यास पोलीस वा जिल्हा प्रशासनाला कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

वृत्तपत्रे सुरक्षितच!
वृत्तपत्रे बंद करण्याचे आदेश नाहीत. उलटपक्षी वृत्तपत्रांचा अत्यावश्यक सेवेत समावेश आहे. वृत्तपत्रे सुरक्षित असून, त्यातून कोरानाचा प्रसार होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने, शासनाने आणि प्रशासनाने तसे स्पष्टच केले आहे. जिल्ह्यातील कोविड फायटर आणि इतर अनेक डॉक्टर्सही वृत्तपत्रे वाचूनच त्यांच्या दिनक्रमाची सुरुवात करतात.

Web Title: Criminal charges against those who send fake WhatsApp messages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onlineऑनलाइन