शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

हमालपुऱ्यात चुलतभावाची चाकूने भोसकून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:01 IST

पोलीस सूत्रांनुसार, कैलास व सुनील हे एकमेकांचे चुलतभाऊ आहेत. कैलासचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले. परंतु, त्याला अपत्य नव्हती. त्याचा चुलतभाऊ सुनील अजबे याची पत्नी सोडून गेली होती. त्यामुळे  त्याने चिंचफैल येथील एका मुलीशी प्रेमसंबंध जुळविले आणि तो नाशिकला राहायला गेला. काही महिन्यांपूर्वी तो हमालपुरा येथे परतला. १३ फेब्रुवारी रात्री कैलास हा सुनीलच्या घरी गेला.

ठळक मुद्देतिघांवर खुनाचा गुन्हा, क्षुल्लक कारणावरून झाला वाद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : क्षुल्लक कारणावरून चाकूने भोसकून चुलतभावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी हमालपुऱ्यात घडली. कैलास मोहन अजबे (३८,रा. चिचफैल) असे मृताचे नाव आहे. या खून प्रकरणात राजापेठ पोलिसांनी आरोपी सुनील माणिक अजबे (४५, रा. हमलापुरा), त्याची पत्नी व आईला अटक केली आहे.पोलीस सूत्रांनुसार, कैलास व सुनील हे एकमेकांचे चुलतभाऊ आहेत. कैलासचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले. परंतु, त्याला अपत्य नव्हती. त्याचा चुलतभाऊ सुनील अजबे याची पत्नी सोडून गेली होती. त्यामुळे  त्याने चिंचफैल येथील एका मुलीशी प्रेमसंबंध जुळविले आणि तो नाशिकला राहायला गेला. काही महिन्यांपूर्वी तो हमालपुरा येथे परतला. १३ फेब्रुवारी रात्री कैलास हा सुनीलच्या घरी गेला. घरात आणलेल्या मुुलीबद्दल विचारणा करून, तिला सोबत ठेवू नको, समाजात बदनामी होत आहे, असे कैलासने सुनीलला  म्हटले. नेमकी हीच बाब सुनीलला खटकली. त्याने कैलासला अपत्य नसल्याबाबत हिणवले. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद शांत झाल्यानंतर कैलास घरी परत गेला. मात्र, रविवारी सकाळीच कैलास हा सुनीलच्या घरी गेला. बदनामी करीत असल्याचे म्हणत त्याच्याशी वाद घातला. त्यामुळे संतापलेल्या सुनीलने कैलासवर चाकुहल्ला चढविला. कैलासच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. दोघांचा वाद बघून सुनीलच्या आईनेसुद्धा कैलासच्या डोक्यावर बत्ता मारला तसेच पत्नी असलेल्या सदर मुलीने रपट्याने मारहाण केली. बत्त्याचा घाव वर्मी लागल्याने कैलास गांगरला. त्याचवळी सुनीलने छातीत चाकू भोसकला. यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. घटनेची  माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच  त्यांनी  घटनास्थळी धाव घेऊन जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनास्थळाला पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, ठाणेदार मनीष ठाकरे यांनी भेट दिली. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.   

तिघांना अटकपोलिसांनी या घटनेनंतर तीनही आरोपींना अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन रक्तबांबाळ अवस्थेत पडलेल्या कैलासला तात्काळ इर्विन रुग्णालयात दाखल केले. झटापटीत सुनीलच्या डोक्यालासुद्धा जखमा झाल्याने त्यालाही दवाखान्यात नेले. याप्रकरणी सुनील अजबे, त्याची पत्नी व आईला पोलिसांनी अटक केली.

 

टॅग्स :Murderखून