शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
6
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
7
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
8
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
9
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
10
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
11
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
12
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
13
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
14
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
15
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
18
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
19
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
20
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्य योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी

By admin | Updated: May 15, 2014 23:06 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सन २0१0-११ मध्ये गतिमान कडधान्य कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ७0 मेट्रिक टन युरिया किंवा त्या मोबदल्यात अनुदान वितरीत करण्यात आले नाही.

मोर्शी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सन २0१0-११ मध्ये गतिमान कडधान्य कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ७0 मेट्रिक टन युरिया किंवा त्या मोबदल्यात अनुदान वितरीत करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना लाभापासून वंचित ठेवणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी, ही मागणी गेल्या मागील तीन वर्षांपासून केली जात होती. आता याबाबत चौकशी समिती गठित करण्यात आली असून दोषीं अधिकार्‍यांवर काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सन २0१0-११ या वर्षात केंद्र शासनाच्या १00 टक्के अनुदानावर गतिमान कडधान्य उत्पादन विकास कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला. जिल्ह्यातील तालुकानिहाय लक्षांकाव्दारे तूर, मूग आणि हरभरा या कडधान्य पिकांसाठी खरीप आणि रबी हंगामात ही योजना राबविण्यात आली होती. परंतु तत्कालीन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी आणि संबंधित अधिकार्‍यांनी खरीप हंगामातील तूर, मूग लाभार्थी शेतकर्‍यांना योजनेंतर्गत ७0 मेट्रिक टन युरीया खताचे वाटप केले नाही. त्याच्या बदल्यात ४ लक्ष ५५ हजार रुपयांचे अनुदानसुध्दा लाभार्थ्यांना दिले नाही. ही रक्कम प्रत्यक्षात शेतकर्‍यांना न देता योजनेतील इतर बाबींवर खर्च दाखवून हडप करण्याचा अधिकार्‍यांचा कट होता, अशी शंका वर्तविली जात होती.

या प्रकरणाची माहिती लेहगाव येथील शेतकरी अरविंद तट्टे यांना मिळाल्यावर त्यांनी विभागीय कृषी सहसंचालकांकडे तक्रार नोंदवून या प्रकरणाची चौकशी आणि दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली होती. परंतु तट्टे यांची तक्रार दाबून ठेवण्यात आली होती. शेवटी या प्रकरणी माहितीच्या अधिकाराचा वापर तट्टे यांना करावा लागला.

या प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासंदर्भात विभागीय कृषी सहसंचालक काहीच हालचाल करीत नसल्याचे पाहून शेवटी याप्रकरणी अरविंद तट्टे यांनी पुणे कृषी आयुक्तालयाच्या दक्षता पथकाकडे तक्रार केली.

शेवटी मागील तीन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अधीक्षक कृषी अधिकारी दक्षता पथक, कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या आदेशान्वये विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता विवेक सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा आणि एस.जी.डाबरे, उपविभागीय कृषी अधिकारी बुलडाणा यांची चौकशी समिती गठित केली आहे. (तालुका प्रतिनिधी)