नांदगावात कोरोनायोद्धा, समाजसेवकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST2021-02-05T05:34:25+5:302021-02-05T05:34:25+5:30

नांदगाव खंडेश्वर : शहरात यंदाही संघर्ष युवा संघटनेच्यावतीने मकर संक्रांतीनिमित्त गरीब, गरजू विधवांना आर्थिक मदत तसेच कोरोनायोद्धा व समाजसेवक ...

Coronary warrior in Nandgaon, honor of social workers | नांदगावात कोरोनायोद्धा, समाजसेवकांचा सन्मान

नांदगावात कोरोनायोद्धा, समाजसेवकांचा सन्मान

नांदगाव खंडेश्वर : शहरात यंदाही संघर्ष युवा संघटनेच्यावतीने मकर संक्रांतीनिमित्त गरीब, गरजू विधवांना आर्थिक मदत तसेच कोरोनायोद्धा व समाजसेवक यांचा सन्मान या सोहळ्याचे आयोजन २३ जानेवारी रोजी ओंकारखेडा येथील शहीद उद्यानात करण्यात आले होते. याप्रसंगी नांदगाव शहराच्या समस्यांबाबत संस्थेच्यावतीने अर्ज भरून घेण्यात आले होते.

कार्यक्रमाला राज्यमंत्री बच्चू कडू, वीरमाता बेबी जानराव उईके, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक सदानंद जाधव, माजी सैनिक मधुकरराव पातोडे, तहसीलदार पीयूष गावंडे, ग्रामीण रुग्णालयच्या अधीक्षक डॉ. प्रवीणा देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी २१ कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला तसेच सात मतिमंद मुलासह सात जणींना आर्थिक मदत देण्यात आली. आरोग्य विभागाचे डॉ. कारमोरे, डॉ. प्रवीणा देशमुख, संगीता देवळे, चित्रा सूर्यवंशी, अमोल मांडवगडे, भूषण भोयर. महावितरणचे विलास शिंदे, सागर सव्वालाखे, सफाई कामगार आशिष देवळे, भगवंतराव पवार, दिनेश आबांडकर, समाजसेवक डॉ मंगेश पचगाडे, रामभाऊ वरठी, गजानन चौधरी, डोमा महाराज, कमला चौधरी, रेखा झिमटे, वंदना सिरसाट व दिनेश कुबडे यांचा सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. उज्ज्वला उईके, लक्ष्मी भंडारे, किरण उईके, मीना कोंडवते, पार्वता सुर्यवंशी, अर्चना लवंगकर या विधवांना व वेदांत गुल्हाने यांना आर्थिक मदत करण्यात आली. कार्यक्रमासाठी महेश चौकडे, संस्थेचे अध्यक्ष दिनेश शेळके, सचिव आशिष खंडार, उपाध्यक्ष मंगेश देवळे, सदस्य शिवा पंधरे, सुनील सूर्यवंशी, सुधाकर कोंडवते, रूपेश भोयर, ऋषी भेंडे, महेश नागपुरे, प्रीतम देशमुख, वैभव कोंडवते, अनिकेत कुमरे, निखिल भेंडे, भीमराव इंगोले, जय पेंदाम, विकी उईके, विनय कोंडवते आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Coronary warrior in Nandgaon, honor of social workers