शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

१९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST

अमरावती : पहिल्या फळीतील कोविड योध्दानंतर अतीजोखमीच्या व्यक्ती तसेच वयोवृद्धांना कोरोना लस देण्याचे शासनाने निश्चित केल्यानंतर सध्या जिल्ह्यात ...

अमरावती : पहिल्या फळीतील कोविड योध्दानंतर अतीजोखमीच्या व्यक्ती तसेच वयोवृद्धांना कोरोना लस देण्याचे शासनाने निश्चित केल्यानंतर सध्या जिल्ह्यात प्रत्यक्ष लसीकरण नाही केली जात आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होऊ नये, या उद्देशाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील ५९ पैकी पहिल्या टप्प्यात बुधवार, १० मार्चपासून १९ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात येत्या मंगळवारनंतर कोरोना लसीकरण सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात काही खासगी लसीकरण केंद्र सुरू केले आहे. त्या ठिकाणी लसीकरणासाठी नागरिकांना २५० रुपये मोजावे लागणार आहे. शासकीय रुग्णालयात मात्र ही लस मोफत दिली जात आहे. सध्या लसीकरणाचे काम शहरी सुरू झाल्यानंतर लगेचच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीसोबतच आवश्यक बाबींचाही पुरवठा आरोग्य विभागाने केलेला आहे. पहिल्या टप्प्यात १९ आरोग्य केंद्रांत लसीकरणास प्रारंभ झाला असून, लस उपलब्ध होताच अन्य आरोग्य केंद्रांतही कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी“लोकमत‘ला दिली. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता चाचणीसाठी ग्रामीण भागात शिबिरे घेतली जात आहे. ज्या नागरिकांना आजाराबाबतचे लक्षण आढळून येत आहेत अशा नागरिकांना जवळच्या चाचणी केंद्रावर चाचणी करून घ्यावी, तसेच कोरोना लसीकरणासाठी ज्यांनी नोंदणी केली आणि लस घेण्यास पात्र असतील अशा नागरिकांनी संबंधित लसीकरण केंद्रावर लस टोचून घेण्याचे आवाहन झेडपी प्रशासनाने केले आहे.

बॉक्स

या आरोग्य केंद्रात लसीकरणाला प्रारंभ

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित जिल्हाभरात ५० प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पहिल्या टप्प्यात अंजनगाव बारी, वलगाव, नांदगाव पेठ, खोलापूर, गणोरी, येवदा, रामतीर्थ, साद्राबाडी, कलमखार, पथ्रोट, धामणगाव गढी, पापळ, कोकर्डा, नेरपिंगळाई, काटकुंभ, तळवेल, घुईखेड, पळसखेड, निंबोली, कुऱ्हा आदी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण सुरू केलेले आहे.

कोट

झेडपी आरोग्य विभागाने सर्वच आरोग्य केंद्रांत कोरोना लसीकरणाबाबत नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात १९ केंद्रात ही सुविधा सुरू केली आहे. काही दिवसांत सर्व ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केले जातील.

- अमोल येडगे,

मुख्यकार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद