शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वरुड तालुक्यात कोरोनाचा ब्लास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 5:00 AM

तहसीलदार सुनील सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार हे यंत्रणाप्रमुख फ्रंटफुटवर येऊन कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र, या लढ्यात लोकसहभाग मिळत नसल्याने कोरोनाचा समूह संसर्ग तालुक्यात वाढीस लागला आहे.

ठळक मुद्दे१७ बळी : बाधितांची संख्या ३०० पार

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड/जरू ड : तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाने पाय रोवले असून, दिवसागणिक संक्रमितांची संख्या वाढत आहे. २० सप्टेंबर रोजी ही संख्या ३३० झाली. लोणी, सावंगा, शेंदूरजनाघाट, वरुड, मांगरूळी पेठ, कुरळी येथे कोरोनाचा ब्लास्ट झाला आहे.तालुक्यात १७ रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तीन, चार सदस्य संक्रमित असल्याने चिंता वाढली आहे. तहसीलदार सुनील सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार हे यंत्रणाप्रमुख फ्रंटफुटवर येऊन कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र, या लढ्यात लोकसहभाग मिळत नसल्याने कोरोनाचा समूह संसर्ग तालुक्यात वाढीस लागला आहे.७ दिवसांचा जनता कर्फ्यू, १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाची मागणीतालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर वरुड शहरासह तालुक्यात गुरुवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात यावा तसेच शहरात १०० खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्याची मागणी तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख किशोर माहोरे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख धीरज खडस्कर, राजू मानकर, वरूड व्यापारी संघाचे सचिव रवि यावलकर, रीतेश शहा, अनिल हेटे, प्रवीण धरमठोक, विनय चौधरी, कन्नू पटेल, सुरेंद्र चांडक, धर्मेश जोशी, विनोद धरमठोक, अशोक भागवत, युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश अग्रवाल, आनंद खेरडे, संदीप तरार, किशोर तडस, कैलाश उपाध्याय, जगदीश उपाध्याय, रमेश हुकूम आदी उपस्थित होते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या