कोरोना, दहा महिन्यांत २२ हजार क्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST2021-02-05T05:31:00+5:302021-02-05T05:31:00+5:30

अमरावती : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या दहा महिन्यांच्या काळात म्हणजेच ३०५ दिवसांत २२ हजार ९७ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. दर ...

Corona, 22,000 crosses in ten months | कोरोना, दहा महिन्यांत २२ हजार क्रास

कोरोना, दहा महिन्यांत २२ हजार क्रास

अमरावती : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या दहा महिन्यांच्या काळात म्हणजेच ३०५ दिवसांत २२ हजार ९७ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. दर दिवशी सरासरी ७२.४४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद या काळात झालेली आहे. सध्या या आठवड्यात संसर्ग पुन्हा वाढला असल्याने दररोज १०० वर पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद सध्या होत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.

जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी येथील हाथीपुरा भागात पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झाली होती. त्या घटनेला आता दहा महिने पूर्ण होत आहेत. या ३०५ दिवसांच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग सर्वच १४ तालुक्यांसह अमरावती शहराचे सर्वच भागात झालेला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग अचलपूर तालुक्यात झालेला आहे. या तालुक्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजाराच्या व वरूड तालुक्यात देखील ९०० च्या घरात आता संसर्ग पोहोचला आहे. याशिवाय अमरावती शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता १४ हजार क्रास करीत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर कोरोना संसर्ग चांगलाच वाढला आहे. या निवडणुुकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन पुरेसे न झाल्याने या आठवड्यात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढलेली असल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण १७ टक्के

जिल्ह्यात मंगळवारी ७१७ चाचण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पॉझिटिव्ह अहवालाचे प्रमाण हे १६.४५ टक्के असल्याने चिंतेची बाब आहे. याशिवाय मंगळवारी दोन कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांचे मृतांची संख्या आता ४२० वर पोहोचली आहे. हेदेखील एकूण कोरोनाग्रस्ताचे तुलनेत २ टक्के प्रमाण आहे.

Web Title: Corona, 22,000 crosses in ten months