शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

शीतपेय विक्रेते करतात नियमांचे उल्लंघन

By admin | Updated: February 22, 2017 00:17 IST

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. याची झळही अमरावतीकरांना पोहोचत आहे.

एफडीएचे दुर्लक्ष : पाणी नमुने तपासावेअमरावती : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. याची झळही अमरावतीकरांना पोहोचत आहे. रात्री थंडी, तर दिवसा ऊन असे दुहेरी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे परप्रांतीय शीतपेय विक्रेत्यांनी अंबानगरीतील मुख्य चौकात आपली दुकाने थाटली आहेत. परंतु सदर शीतपेय विक्रेते कुठलाही नियम पाळत नाहीत. अनेक शीतपेय विक्रेत्यांनी एफडीएकडे नोंदणीच केली नसल्याची बाब पुढे आली आहे. नियमाने या ठिकाणी नागरिकांना पिण्याचे पाणी देताना ते पाणी नमुने जिल्हा प्रयोगशाळेत तपासलेले असावे, पण कुठलाही नियम न पाळता नागरिकांना दूषित पाणी पाजण्याचा प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.विषाणु संसर्गामुळे शहरात अनेक आजार होत असून अन्न व प्रशासन विभागाने अशा शीतपेय विक्रेत्यांकडून पाणी नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविल्यास त्यातील सत्य बाहेर येईल. त्यामुळे अशा नियमबाह्य वागणाऱ्या ज्यूस व थंड शीतपेय विक्रेत्यांवर अंकुश बसेल. जेथे अन्न पदार्थ तयार केले जातात, तेथे घाणीचे साम्राज्य असू नये, असा नियम आहे. कारण घाणीवर घोंघावणाऱ्या तेथील माशा त्या पदार्थावर जाऊन बसतात. तेथून नागरिकांच्या आरोग्याला बाधा निर्माण होते. हागवण व डायरीयाचे आजारही यापासून होण्याची दाट शक्यात असते. उन्हळ्याची आग शामविण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात शीतपेय पिण्यासाठी धाव घेतात. परंतु त्यांना नियमाने सेवा मिळत नाही. यातून नकळत त्यांना अनेक आजाराला सामोरे जावे लागते. (प्रतिनिधी)काय आहे नियम ? ज्या ठिकाणी अन्न पदार्थ किंवा इतर ज्यूस व थंड पदार्थ तयार केले जातात तेथे घाणीचे साम्राज्य असू नये, नेहमी हा परिसर स्वच्छ ठेवावा, प्लेट्स व ग्लास धुण्यासाठी स्वतंत्र बेसीन असावे, ज्या ठिकाणी हे शीतपेय किंवा अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात त्या ठिकाणी अन्न सुरक्षा मानद कायद्यानुसार पाळीव प्राणी उदा. कुत्रे, मांजर व इतर प्राण्यांचा वावर असू नये. जे पाणी नागरिकांना पिण्यासाठी देण्यात येते त्या पाण्याची तपासणी जिल्हा वैद्यक प्रयोगशाळेत करवून तेथील पाणी पिण्यास योग्य आहे, यासंदर्भाचे प्रमाणपत्र शीतपेय किंवा इतर हॉटेलमध्ये लावून ठेवावा. यासर्व नियमांचे उल्लंघन होत असेल तर नियमाने अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा किंवा शीतपेय विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याचा अधिकार त्यांना आहे.शहरात शंभराच्यावर शीतपेय विक्रेतेशहरातील विविध मोठ्या चौकांत शहरातील व परप्रांतीय शीतपेय विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्याची संख्या शंभरच्यावर आहे. तीन ते चार महिन्यांचा त्यांचा व्यवसाय राहतो. पण अनेक शीतपेय विक्रेत्यांनी व ज्यूस सेंटरच्या संचालकांनी एफडीए विभागाकडून नोंदणी किंवा परवाना घेतले नसल्याची माहिती आहे.