शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कंत्राटदार एजन्सीला महापालिकेत ‘नो एन्ट्री’

By admin | Updated: April 2, 2017 00:07 IST

दैनंदिन साफसफाईला फाटा देऊन प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या ‘इसराजी’ या सफाई कंत्राटदार संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

काळ्या यादीत : गुरुवारी आदेश निर्गमितअमरावती : दैनंदिन साफसफाईला फाटा देऊन प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या ‘इसराजी’ या सफाई कंत्राटदार संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या कारवाईमुळे संस्थेला महापालिका क्षेत्रात काम करता येणार नाही किंवा कुठली निविदाही भरता येणार नाही. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी गुरूवारी सायंकाळी याबाबतचे आदेश निर्गमित केलेत. इसराजी बहुउद्देशीय संस्थेला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावाला आयुक्तांनी २५ मार्च रोजी हिरवी झेंडी दिली होती. नोटशिटवर स्वाक्षरी करून शेटे यांना त्याबाबत आदेश पारित करावयाचे होते. मात्र, आदेश काढण्यास होणारा उशीर पाहता त्या कंत्राटदाराने ‘ब्लॅकलिस्ट’ होण्यापासून वाचण्यासाठी अनेकांचे उंबरठे झिजविले. बहुतांश बड्या अधिकाऱ्यांच्या दालनाची धूळ माथी लावून या कंत्राटदाराने ‘सहीसलामत’ बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. ‘रि-इस्टेट’चे आश्वासनअमरावती : प्रभागातील नगरसेवकांसह महापौरांकडे धाव घेतली. आदेश निघायचा असल्याने त्या कंत्राटदाराला मोठी संधी मिळाली. अखेर ३० मार्चला सायंकाळी ‘इसराजी’ या कंत्राटदार संस्थेच्या ‘ब्लॅकलिस्ट’ होण्यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान आदेश निघाला तरी काही बिघडले नाही. आठवडाभरात ‘रि-इस्टेट’ करू, असा शब्द एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या कंत्रादाराला दिल्याचे समजते. रामपुरी कॅम्प प्रभाग क्र. ५ मध्ये दैनंदिन स्वच्छतेचे कंत्राटदार इसराजी महिला सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेकडे सोपविण्यात आले होते. मात्र या संस्थेने अर्धेच कामगार कामावर लाऊन अटी-शर्तींचा भंग केला. स्वच्छतेत कुचराई केली. यासंस्थेच्या कामगारांनी संप केल्याने आरोग्याचा गहण प्रश्न निर्माण झाला होता. त्याबाबत महापालिकेकडून त्याला वारंवार कळविण्यात आले. सुधारणा करण्याची संधी देण्यात आली. मात्र, दैनंदिन स्वच्छतेच्या कामात ‘इसराजी’ने कुठलीही सुधारणा केली नाही. महापौरांसह संबंधित प्रभागातील नगरसेवकांनीही याबाबत तक्रार नोंदविली होती. त्याअनुषंगाने संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. आता त्या संस्थेसाठी महापालिकेचे द्वार बंद झाले आहे. (प्रतिनिधी)कळीचा नारद कोण ? ‘ब्लॅकलिस्ट’च्या कारवाइतून वाचण्यासाठी ‘इसराजी’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरकस प्रयत्न केले. यातच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला ही कारवाई मागे घेऊ, असे शब्द दिल्याने ही कारवाई मागे तर घेण्यात येणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे महपौरांच्या तक्रारीनंतर व कारवाईचा आदेश निघाल्यानंतरही कारवाई मागे घेण्याचा शब्द देणारा तो कळीचा नारद कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कंत्राट रद्द सन २०१६-१७ वर्षासाठी हे कंत्राट असल्याचे आदेशात नमूद आहे. अनियमिततेमुळे रामपुरी कॅम्पमधील दैनंदिन साफसफाईचे कंत्राट ३१ मार्च २०१७ पासून रद्द करण्यात आले आहे. तसेच संस्थेचे नाव मनपाच्या काळ्या यादीमध्ये टाकण्यात आले आहे.