शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

बदली आदेशाच्या अवमाननेची परंपरा !

By admin | Updated: January 15, 2017 00:07 IST

कार्यालयीन प्रशासकीय कामकाज सुलभ व्हावे, यासाठी नियमितपणे बदली प्रक्रिया राबविली जाते.

बदली टाळण्यासाठी ऊर्जा खर्ची : महापालिकेत चुकीची पद्धत रुढ अमरावती : कार्यालयीन प्रशासकीय कामकाज सुलभ व्हावे, यासाठी नियमितपणे बदली प्रक्रिया राबविली जाते. तथापि बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होता ती बदली टाळण्यासाठीच जोरकस प्रयत्न केले जातात. प्रसंगी प्रशासनावर राजकीय दबाव आणला जातो. स्वास्थ्य कर्मचारी अरुण तिजारे हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण असले तरी प्रशासकीय प्रमुखाच्या बदली आदेशाची अवमानना करण्याची पद्धतच महापालिकेत रुढ झाल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.महापालिकेत आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त आणि अपवादात्मक प्रसंगी उपायुक्त (प्रशासन) ही कर्मचाऱ्यांचे बदली आदेश काढतात. आदेश प्राप्त होताच संबंधितांनी त्वरित बदली झालेल्या विभागात रुजू होऊन तसा अहवाल सामान्य प्रशासन विभागात सादर करावा. त्याचप्रमाणे विभागप्रमुखांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेशित केले जाते. तथापि महापालिकेतील बहुतांश कर्मचारी या आदेशाला खो देतात.विभागप्रमुख कार्यमुक्त करीत नाहीत, असे लंगडे समर्थन केले जाते. प्रत्यक्षात संबंधित कर्मचाऱ्याकडूनच सोईचा टेबल सुटत नाही.सामान्य प्रशासन विभागाकडूनही त्याबाबत विचारणा किवा पाठपुरावा केला जात नाही. आणि काही कालावधीनंतर तो कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू न होता आहे. त्याच ठिकाणी स्थिरावतो.आयुक्त किंवा अन्य प्रशासकीय उच्चपदस्थांच्या आदेशाची राजरोसपणे अवमानना केली जाते. शिस्तीचा भंग होतो. शिस्तभंग कारवाई मात्र होत नाही. त्यामुळेच बदली आदेशाला खो देत कर्मचाऱ्यांमध्ये चुकीच्या परंपरेचे पाईक होण्याची जणू अहमहमिका लागली असावी,असे चित्र अनुभवायास मिळत आहे. (प्रतिनिधी)आयुक्तांचा लक्षवेध आयुक्त हेमंत पवार हे पारदर्शी कारभारासाठी ओळखले जातात.मात्र त्यांच्या बदली आदेशाला हरताळ फासण्याचे धाडस कर्मचारी दाखवत असल्याचे विदारक वास्तव आहे.आयुक्तांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेले बदली आदेश आणि प्रत्य़क्षात बदलीस्थळी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण पाहिले तर प्रशासकीय अवमाननेचा टक्काच अधिक असल्याची नकारात्मक वस्तुस्थिती आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाचीही पायमल्ली केली जाते.बदलीस्थळी रुजू न होता आहे त्याच ठिकाणी आपले अनेक सहकारी काम करतात,हे पाहल्यांतर अनेकजण आपलेच काय होणार?अशी सोईस्कर भुमिका घेत बदली आदेश टाळतात.