शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

वरूडमध्ये काँग्रेसद्वारे विद्युत बिलाची होळी

By admin | Updated: August 18, 2016 00:09 IST

शहरासह तालुक्यातील विविध प्रलंबित मागण्यांकरिता तालुका काँग्रेस तसेच युवक काँग्रेसच्यावतीने....

रास्ता रोको आंदोलन : ३५ आंदोलकांना अटकवरूड : शहरासह तालुक्यातील विविध प्रलंबित मागण्यांकरिता तालुका काँग्रेस तसेच युवक काँग्रेसच्यावतीने १६ आॅगस्टला पांढुर्णा चौक परिसरात युवानेते विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्युत बिलाची होळी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ३५ आंदोलकांना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. तालुक्यासह शहरातील वीज ग्राहकांना जादा वीज बिल येत असल्याने विद्युत ग्राहकांची लूट होत आहे. वरुड शहरात मोकाट जनावरे रस्त्यावर बसत असल्याने अपघाताला आमंत्रण दिले जात आहे. वारंवार नगरपरिषदेला निवेदने देवूनही कारवाई झाली नाही. वरुड शहरातील नाल्या, रस्ते आदींच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी व्हावी, गांधी पुतळयामागे असणारे भाजीवाले, फळवाले, किरकोळ दुकानदाराच्या दुकानाकरीता जागा उपलब्ध करून द्यावी, सावता चौकातील उचललेल्या दुकानदारांना जागा मिळण्याकरिता गोठाण ते नाथ मंदिर ते राममंदिर आणि शहीदस्मृती मंदिर रस्ता, शाकुंतल विहार, गोविंद विहार, विजयनगर, लक्ष्मीनगर, रेणुकानगर, ताजनगर, सूर्यानगर, आंडेवाडी, जयश्रीनगर आदी भागातील रस्त्यांची दुर्दशा दूर करणे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये तालुका काँग्रेस कमिटी, मोर्शी विधानसभा युवक युवक काँग्रेस, शहर युकाँ, अल्पसंख्यक शहर युकाँचे पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारातून वर्धा लोकसभा युकाँचे अध्यक्ष विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी धनंजय बोकडे, अजय नागमोते, अनिल गुल्हाने, प्रमोद टाकरखेडे, राहुल चौधरी, अनिल कडू, उमेश रडके, प्रमोद रडके, हरिश वरखेडकर, बंटी काझी, अजहर काझी, मो. निसार, हेमंत कोल्हे, विकास पांडे, अनिल आंडे, विजय चौधरी, स्वप्नील खांडेकर, राहुल नेरकर, अंकुश राऊत, नरेंद्र पावडे, वसंत निकम यांचा समावेश होता. मुख्याधिकारी प्रकाश राठोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वीज बिलांची होळी करण्यात आली. ठाणेदार गोरख दिवे यांनी बंदोबस्त ठेवला. (तालुका प्रतिनिधी)