'महाराष्ट्राची लेक मोठी झाल्यास बघायला आवडेल'; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन यशोमती ठाकूर यांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 04:09 PM2023-05-03T16:09:37+5:302023-05-03T16:14:27+5:30

पक्षाध्यक्षपद सोडण्यावर शरद पवार ठाम राहिले तर काय पर्याय असू शकतात याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

Congress leader Yashomati Thakur has expressed the opinion that Supriya Sule should become the president of the Nationalist Congress. | 'महाराष्ट्राची लेक मोठी झाल्यास बघायला आवडेल'; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन यशोमती ठाकूर यांचं मत

'महाराष्ट्राची लेक मोठी झाल्यास बघायला आवडेल'; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन यशोमती ठाकूर यांचं मत

googlenewsNext

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. मंगळवारी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आज घोषणा केली. मात्र सार्वजनिक जीवनात आपण कार्यरत राहणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली. 

पक्षाध्यक्षपद सोडण्यावर शरद पवार ठाम राहिले तर काय पर्याय असू शकतात याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आहे. राज्यसभा सदस्य असलेले आणि शरद पवार यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध असलेले प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची ही चर्चा आहे. याशिवाय सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या चर्चांवर काँग्रेसच्या नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. सुप्रिया सुळे ह्या पुरोगामी विचारांना मानणाऱ्या आहे. त्या मोठ्या झालेल्या आम्हाला नक्की आवडेल. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व्हाव्या. शेवटी सुप्रिया सुळे शरद पवारांच्या लेक आहेत. महाराष्ट्राची लेक मोठी झाल्यास बघायला आवडेल, असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

शरद पवार, राजीनामा अन् चर्चांना उधाण-

अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शरद पवार यांना नेमकी कोणती खेळी केली, याविषयी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. वयाच्या ८३व्या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला पर्याय नाही, हे शरद पवार यांनी दाखवून देण्यासाठीच त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसण्याची धूर्त खेळी खेळल्याचे मानले जात आहे. 

Web Title: Congress leader Yashomati Thakur has expressed the opinion that Supriya Sule should become the president of the Nationalist Congress.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.