शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शालेय व्यवस्थापन समिती स्थापनेबाबत संभ्रम

By admin | Updated: October 1, 2014 23:16 IST

राज्यात विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने यावर्षी स्थापन करण्यात येणाऱ्या शालेय व्यवस्थापन समितीसंदर्भात स्पष्ट निर्देश मिळाले नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांसह शिक्षक संभ्रमावस्थेत आहेत.

अमरावती : राज्यात विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने यावर्षी स्थापन करण्यात येणाऱ्या शालेय व्यवस्थापन समितीसंदर्भात स्पष्ट निर्देश मिळाले नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांसह शिक्षक संभ्रमावस्थेत आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील भाग चार, कलम २१ नुसार प्रत्येक प्राथमिक शाळेत (विना अनुदानित वगळून) शाळा व्यवस्थापन समिती ३० सप्टेंबरपूर्वी स्थापन करणे अनिवार्य आहे. या समितीकडे शाळेच्या कामकाजाचे सनियंत्रण सोपविण्यात आले होते. ३० सप्टेंबर २०१० पूर्वी कार्यरत ग्राम शिक्षण समिती, वॉर्ड शिक्षण समिती, शालेय समितीच्या रचनेत बदल करुन नवीन शिक्षण कायद्याप्रमाणे शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्यांदा ३० सप्टेंबर २०१० मध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अस्तित्वात आल्या. या समिती स्थापन करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असून पालक ग्रामसभेद्वारे समिती स्थापन केली जाते. समितीचा कार्यक्रम दोन वर्षांचा आहे. त्यात ५० टक्के महिला सदस्यांसोबतच स्थानिक शिक्षण तज्ज्ञ स्थानिक प्राधिकरण सदस्यांचा समावेश असतो. ७५ टक्के सदस्य पालकांमधून निवडले जातात. समितीकडे शालेय विकास आराखडा तयार करणे, शाळेत आलेल्या निधीच्या विनियोगावर देखरेख, शालेय पोषण आहार, मुख्याध्यापकांची रजा मंजूर करणे या महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत.शालेय अवस्थापन समीत्या राज्यात पहिल्यांदा २०१० त्यानंतर २०१२ मध्ये अस्तीत्वात आल्या.यावर्षी राज्यातील सर्व शाळांमध्ये कार्यरत समित्यांचा कालावाधी ३० सप्टेंबर २०१४ ला संपली आहे. त्यापूर्वी नविन समित्या स्थापन करणे अनिवार्य आहे. परंतु राज्यात आचारसंहिता लागु असल्याने या समित्या स्थापन कराव्यात की नाही या संदर्भात शिक्षण विभागातर्फे कुठलेच निर्देश सुचना, आदेश न आल्याने सर्वत्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. निवडणुकीनंतर समिती स्थापन झाल्या तर पुढील समितीस दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी प्राप्त होईल. त्यामुळे या संदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.