शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादकांवर चिंतेचे सावट

By admin | Updated: December 15, 2015 00:15 IST

वरुड तालुक्यात सततच्या नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहे. परंतु शेतीशिवाय पयार्य नसल्याने मिळेल तेथून कर्ज घेऊन पुन्हा नव्या आशेने शेती केली.

दरात घसरण : पांढऱ्या सोन्याची कडू कहाणी! वरुड : वरुड तालुक्यात सततच्या नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहे. परंतु शेतीशिवाय पयार्य नसल्याने मिळेल तेथून कर्ज घेऊन पुन्हा नव्या आशेने शेती केली. परंतु यावर्षी दिवाळीत दिव्याच्या वातीला कापूस तर राशीला धान्य नव्हते, तर आता कर्ज फेडण्यास घरात कापूस नाही. शेतीने दगा दिल्याने हिरवे स्वप्न भंगले असल्याने शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. कापसाला भाव नसल्याने उत्पादन खर्चसुध्दा काढणे जड होत आहे. वरुड तालुका देश विदेशात प्रसिध्द आहे. सतत कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा एवढ्यावरच हा प्रकोप थांबला नसून गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. बहुगुणी संत्राचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र नैसर्गिक आपत्तीने संत्र्याचे पीक हातातून गेले. यंदा मृगात पावसाने दडी मारल्याने पिकांची पेरणी उशिरा झाली. तब्बल एक महिना उशिरा कपाशी, मिरची, तूर, ज्वारी सह आदी पिकांची लागवड करण्यात आली. सोयाबीननेसुध्दा दगा दिल्याने दिवाळीच्या राशीकरिता सोयाबीन घरात आले नाही. सोयाबीन उत्पादनामध्ये कमालीची घट झाल्याने सोयाबीन उत्पादकांना लाखोंचा फटका बसला. संत्रा आंबिया बहरसुध्दा गळाल्याने ५० ते ६० टक्के संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले. मृगबहर आलाच नाही. यामुळे संत्रा उत्पादकांनासुध्दा मोठा फटका बसला. कपाशी, मिरचीचे पीकसुध्दा बुडाले, मिरचीवर कोकड्या रोगासह अज्ञात रोगाने थैमान घातल्याने शेकडो हेक्टर जमिनीतील मिरचीचे पीक बुडाले. त्यामुळे मिरची पीक नेस्तनाबूत झाले. लाखो रुपयांचा फटका मिरची उत्पादकांना बसला. पुन्हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे. यामुळे मार्चमध्ये कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. कापसाला पणन महासंघाकडून ४ हजार १०० रुपये तर खासगी व्यापारी सुध्दा तेवढाच भाव देत आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे बुरे दिन सरू झाल्याची कुजबूज सुरू झाली आहे. नापिकी आणि भावात घसरण असल्याने कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादन खर्चसुध्दा निघत नसल्याने कपाशीला शासनाने सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, अशी मागणी केली आहे.