शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संगणक केंद्र कुचकामी तलाठी कार्यालयात गर्दी

By admin | Updated: May 18, 2015 00:11 IST

शासनाने प्रत्येक तालुकास्थळी संगणकावर अद्ययावत सातबारा मिळण्याची सोय केली असली तरी येथील तहसील कार्यालयात दोन ...

फजिती : कर्जासाठी बँका मागतात अद्ययावत सातबारा प्रभाकर भगोले चांदूररेल्वेशासनाने प्रत्येक तालुकास्थळी संगणकावर अद्ययावत सातबारा मिळण्याची सोय केली असली तरी येथील तहसील कार्यालयात दोन वर्षांपूर्वीची नोंद असल्याने शेतकरी अद्ययावत सातबारासाठी तलाठी कार्यालयाकडे धाव घेत आहेत. राष्ट्रीयीकृत बँक अधिकारी अद्ययावत शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणासाठी सातबाराचा आग्रह धरतात. शासनाने आॅनलाईन सुविधा देण्याची प्रक्रिया सर्वच शासकीय कार्यालयांत सुरू असताना चांदूररेल्वे तहसील कार्यालयाच्या भोंगळ कारभाराने शेतकऱ्यांना हेलपाटे घेण्याची पाळी आली आहे. शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाकडे न जाता तहसील कार्यालयात त्यांच्या मालकीचा ७/१२ ची तीस रूपये रोख देऊन प्रत्येक तहसील कार्यालयात सोय करण्याची प्रक्रिया राज्यभर सुरू आहे. संगणक स्थळी कर्मचाऱ्यांची नेमणूकही आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना ही माहिती नसेल ते तहसील कार्यालयात ७/१२ मिळते, या उद्देशाने ग्रामीण भागातून येतात आणि बँक अधिकाऱ्यांनी ७/१२ ची पाहणी केल्यानंतर हा ७/१२ २०१३ चा आहे. आता २०१५ चा ७/१२ आणा यानंतर शेतकरी तलाठ्याचा शोध घेऊन तलाठी कार्यालय गाठून शेताचे उतारे घेतात. परंतु चांदूररेल्वे तहसील कार्यालयात ठाण मांडून बसणारे अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून याबाबत दखल घेत नसल्याने याबाबत वरिष्ठांकडेही तक्रारी झाल्याची चर्चा आहे. अधिकारीही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने कसेतरी टाईमपास सुरू असल्याची चर्चा तहसील कार्यालयात सुरू राहते. शेतकऱ्यांना घ्यावे लागणाऱ्या हेलपाट्याची दखल घेईल कोण, असा प्रश्न सध्या तरी शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.