शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारावर अवलोकनार्थ समितीचा वॉच

By admin | Updated: September 16, 2014 23:26 IST

शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करत सुरू केलेली शालेय पोषण आहार योजना आवश्यक त्या प्रमाणात गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे शासनाने केलेल्या एका पाहणीत स्पष्ट झाले आहे.

अमरावती : शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करत सुरू केलेली शालेय पोषण आहार योजना आवश्यक त्या प्रमाणात गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे शासनाने केलेल्या एका पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्यानंतर शासनाने याची दाखल घेऊन शासनाने पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी राज्य समीक्षा पथकाची स्थापना केली आहे. त्यामार्फत जिल्ह्यातील शाळामधील आहाराची तपासणी करण्यात येणार आहे त्यामुळे आता पोषण आहारातील गैरप्रकार दूर करून विद्यार्थ्यांपर्यंत आहार पोहचण्यास मदत होणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळून त्यांची सर्वांगिन वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. आहारातून विद्यार्थ्याच्या वाढीसाठी आवश्यक त्या कॅलरीजचा आहार देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दररोज वेगवेगळ्या पद्धतीचा आहार देण्याचेही ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार शाळेतून आहार दिला जातो. पुरवठा विभागामार्फत शाळांना त्यासाठी तांदूळ आणि शासनाने नेमलेल्या ठेकेदारामार्फत अन्य साहित्य पुरवले जाते. त्यातून शाळांनी नेमलेले स्वयंपाकी आणि मदतनिसांमार्फत आहार तयार करून दिला जातो. शाळेतून दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये सातत्य नसल्याची ओरड होते. त्याच बरोबर दिला जाणारा तांदूळ आणि अन्य साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचेही आरोप केले जातात. ज्या प्रमाणात आहार शिजवायचा आहे त्या प्रमाणात तो शिजवला जात नाही त्याचबरोबर तो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचेही शासनाने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. याची दखल घेऊन आहाराच्या तपासणी करण्यासाठी राज्य समिक्षा पथकाची स्थापना केली आहे. या पथकामार्फत शाळांतील आहाराच्या अंमलबजावणी यंत्रणेची व आहाराची तपासणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)