शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘चला बोलूया...नैराश्य टाळूया..’

By admin | Updated: April 7, 2017 00:17 IST

आज ७ एप्रिल रोजी आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करीत आहोेत. बदलत्या काळानुरूप आरोग्याच्या बदलत्या संकल्पनांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.

उपचार शक्य : वेगवान जीवनशैलीमुळे वाढताहेत मनोविकार वैभव बाबरेकर  अमरावतीआज ७ एप्रिल रोजी आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करीत आहोेत. बदलत्या काळानुरूप आरोग्याच्या बदलत्या संकल्पनांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. याअनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने यंदा ‘चला बोलूया..नैराश्य टाळूया’ हे घोषवाक्य घेतले असून त्याअनुषंगाने विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. तल्लख मेंदुच्या बळावर जगताना मानवाने अनेक नवे सुखकारक बदल घडवून आणलेत. बुद्धीच्या बळावर विज्ञानाला गुलाम बनवून एका नवीन समाजव्यवस्थेचा जन्म झाला. त्यामुळे मानवाची झपाट्याने प्रगती झाली. या नव्या समाजव्यवस्थेत अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोेबर आणखीही बरेच काही मानवाला मिळाले. पण, मोबदल्यात शरीराचे आरोग्य आणि मनाचे समाधान मात्र हिरावून घेतले. म्हणूनच िप्रत्येकाला आज कुठे ना कुठे्, कधी ना कधी नैराश्याचा सामना करावा लागतो. आयुष्यातील इतर सकारात्मक गोष्टी विसरून फक्त नकारात्मक परिस्थितीला उराशी कवटाळून ठेवणे म्हणजे नैराश्य. मर्यादेपलिकडे दु:खाला ताणून धरणे म्हणजे नैराश्य. त्यामुळेच निराशा हे आजारी मनाचे प्राथमिक लक्षण असते. स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत ‘नैराश्य आजारा’वर विशेष मोहीम राबविणार असून जिल्हा शल्य चिकित्सक अरूण, मानसोपचार तज्ज्ञ अमोल गुल्हाने, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता दीपक ठाकरे हे विशेष मोहीम राबवित आहेत.नैराश्याची प्रमुख दोन लक्षणेसतत उदास वाटणे, कोणत्याही कामात मन न लागणे, ही नैराश्य या आजाराची दोन प्रमुख लक्षणे आहेत. सोबतच झोप न लागणे, एकाग्रता, आत्मविश्वास कमी होणे, अस्वस्थता, आत्महत्येचे विचार मनात सातत्याने घोळणे, ही लक्षणे देखील आढळून येतात. जेव्हा-जेव्हा व्यक्ती मनोविकृतीने पछाडते तेव्हा एक गोष्ट निश्चित दिसून येते ती म्हणजे रूग्णाचे व कुटुंबियांचे किंवा त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांचे बिघडलेले संबंध पूर्ववत चांगले होत नाहीत तोवर ही स्थिती अशीच राहते. यासाठी रूग्णाला औषधोपचारासोबतच समुपदेशन व कुटुंबियांना रूग्णांच्या पुनर्वसनाबाबत माहिती देणे गरजेचे असेत.