शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालये, वसतिगृहांचे होणार विद्युत, सुरक्षा ‘ऑडिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST

अमरावती : राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी महाविद्यालये, वसतिगृहांचे इलेक्ट्रिक ...

अमरावती : राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी महाविद्यालये, वसतिगृहांचे इलेक्ट्रिक आणि सुरक्षा ऑडिट करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. गत १० महिन्यांपासून महाविद्यालये, वसतिगृहे बंद होती, त्याचा वापर न झाल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले जात आहे.

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वीज ऑडिटवर भर दिला जात आहे. दरम्यान १ फेब्रुवारी रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उद्य सामंत यांनी ऑनलाईन बैठक घेत विद्यापीठाच्या कुलगुरुंशी संवाद साधला. या बैठकीत विद्यापीठ, महाविद्यालये सुरू करण्याबाबत चर्चा झाली, त्याअनुषंगाने १५ फेब्रुवारीपासून अकृषि विद्यापीठ संलग्न महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहे. मात्र, महाविद्यालये, वसतिगृहे सुरू करण्यापूर्वी इलेक्ट्रिक, सुरक्षा ‘ऑडिट’ करावे लागणार आहे. याबाबतचा अहवाल संबंधित विभागप्रमुखांना सादर करावा लागणार आहे. महाविद्यालये, वसतिगृहे सुरू झाल्यानंतर बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सुरक्षा ऑडिटशिवाय ते सुरु करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. महाविद्यालये टप्प्या टप्प्याने सुरु करण्यासाठी विद्यापीठांना एसओपी तयार करावी लागणार आहे.

---------

कोट

परीक्षेसाठी ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, विद्यापीठ, महाविद्यालयात उपस्थितीसाठी विद्यार्थ्यांना सक्ती केली जाणार नाही. मात्र, ईलेक्ट्रिक, सुरक्षा ‘ऑडिट’शिवाय महाविद्यालये, वसतिगृहे सुरू करता येणार नाही.

- केशव तुपे, सहसंचालक, उच्च व शिक्षण अमरावती.

-------------------

अशी आहे जिल्ह्यात कॉलेज, वसतिगृहांची संख्या

महाविद्यालये- ११८

वसतिगृहे (समाजकल्याण) - २३

वसतिगृहे (आदिवासी) - १८