शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांच्या लसीकरणाला को-विन ॲपचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

अमरावती : सध्या ज्येष्ठांसह सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण सुरू आहे. या व्यक्तींनी डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करणे ...

अमरावती : सध्या ज्येष्ठांसह सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण सुरू आहे. या व्यक्तींनी डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तीन दिवसांत ५८० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. दरम्यान तिसऱ्या दिवशीही को-विन ॲपचा खोडा कायम होता.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विमा योजनेत नोंदणीकृत रुग्णालये अशा योजनांमध्ये नोंदणीकृत असलेल्या ८ खासगी रुग्णालयात शासकीय निकषानुसार जागा, लस साठवणुकीची सोय, आवश्यक परिचारिका व इतर मनुष्यबळ असल्यास याठिकाणी कोरोना लसीकरण सेंटर निश्चित करण्यात येऊन टप्‍प्‍याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, महापौर चेतन गावंडे यांनी बुधवारी पीडीएमसी व डेंटल कॉलेजमधील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. ‘पीडीएमसी’चे अधिष्‍ठाता ए. टी. देशमुख, डेंटल कॉलेजचे अधिष्‍ठाता राजेश गोंधळेकर, आरोग्‍य अधिकारी विशाल काळे आदी उपस्थित होते.

ज्येष्ठांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली असून त्यात ६० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिक, तसेच सहव्याधी (को-मॉर्बेडिटी) असणारे ४५ ते ५९ वयाचे नागरिकांचे लसीकरण होत आहे.

बॉक्स

को-मॉबेडिबी रुग्णांना प्रमाणपत्र अनिवार्य

को-मॉर्बेडिटीमध्ये पल्मनरी आर्टरी हायपरटेन्शन आणि हायपरटेन्शन, डायबेटीस ऑन ट्रीटमेंट, अंजायना आणि हायपरटेन्शन, डायबेटीस ऑन ट्रीटमेंट व इतर आजारांचा समावेश आहे. केंद्र सरकारमार्फत वैद्यकीय सेवा देणाऱ्या नोंदणीकृत व्यावसायिक यांच्याकडून घ्यावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना निश्चित करण्यात आलेल्या नमुन्यामध्ये प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे.

बॉक्स

लसीकरण लाभार्थ्यांची नोंदणी करताना ओपन स्लॉटमध्ये लाभार्थी स्वत:चा मोबाईल नंबर ‘कोविन.जीओव्ही.इन’ या वेबसाईटवर भरून येणाऱ्या ओटीपीनुसार नोंदणी करून लसीकरणाची वेळ व दिनांक स्वत: निश्चित करू शकता. याशिवाय रिझर्व्ह स्लॉटमध्ये स्वत:हून नोंदणी करणे शक्य नाही, असे लाभार्थी महानगरपालिकेने स्थापित केलेल्या बुथवर आपली नोंदणी करून लस घेऊ शकतात.

बॉक्स

ही कागदपत्रे अनिवार्य

लसीकरणासाठी ६० वर्षांवरील नागरिकांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, कार्यालयीन, निवडणूक ओळखपत्र इत्यादी वयाबाबतच्या योग्य पुराव्याची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सहव्याधी असणाऱ्या नागरिकांनी वयाच्या पुराव्यासोबतच वैद्यकीय सेवा देणा-या नोंदणीकृत व्यावसायिकाकडून विहीत नमुन्यात प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्र ठिकाणी दाखविणे आवश्यक आहे.

बॉक्स

शासकीयमध्ये मोफत, खासगीत २५० रुपये डोज

महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्रत्येक डोस मोफत देण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये, सीव्हीसी नोंदणीकृत रुग्णालयात लस घेण्यासाठी प्रति लाभार्थी रुपये २५० रुपये प्रति डोज शुल्क आकारण्यात येईल. लाभार्थ्याने पहिला डोस घेतल्यानंतर २८ ते ४२ दिवस अंतरात दुसरा डोज घेणे बंधनकारक आहे.