शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

वरुड शहर कडकडीत बंद

By admin | Updated: September 22, 2014 23:12 IST

येथील नितीन बैस या युवकाचे अपहरण करुन त्याची क्रूर हत्या केल्याच्या निषेधार्थ सोमवारी वरुड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली.

वरुड : येथील नितीन बैस या युवकाचे अपहरण करुन त्याची क्रूर हत्या केल्याच्या निषेधार्थ सोमवारी वरुड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. शाळा-महाविद्यालयांना यातून वगळण्यात आले होते. येथील नितीन बैस (ठाकूर) याचे १७ सप्टेंबर रोजी अपहरण करुन हत्या करण्यात आली. मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करण्यात आला. या क्रूर हत्येप्रकरणी भाजपचे वरुड तालुकाध्यक्ष योगेश घारड, राम दुर्गे, राम बिजवे, दिनेश बारस्कर आणि नितीनचा कारचालक रमाकांत ब्राम्हणे (सर्व रा.वरुड) या पाच आरोपींना अटक करण्यात आली. नितीन बैस हत्येप्रकरणी आरोपींना अटक केल्यानंतर रविवारी रात्रीच पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी गर्दी केली होती. त्याचवेळी सोमवारी वरुड शहर बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आज सोमवारी सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी बाजारपेठेतील प्रतिष्ठाने उघडलीच नाही. काही व्यापाऱ्यांनी उघडलेली आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद केले. या बंदतून शाळा-महाविद्यालयांना वगळण्यात आले होते. येथील बाजारपेठ परिसरात दुकाने बंद असल्याने शुकशुकाट दिसून आला. परंतु काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला नागरिक घोळक्याने चर्चा करताना दिसून आले. दुपारनंतर बाजारपेठ काही प्रमाणात सुरु झाली होती. हत्येनंतर पोलिसांनी येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती. वरुडसह बेनोडा, शेंदूरजना घाटचे पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. तसेच अमरावतीहून ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक वरुडमध्ये तळ ठोकून आहे. चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.