शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

वन संवर्धनात नागरिकांचा पुढाकार आवश्यक

By admin | Updated: January 8, 2017 00:09 IST

शहरालगतच्या समृद्ध जंगलात वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले. असून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभाग आहे.

नागरिकांचीही जबाबदारी : वनविभागाचा सक्रिय सहभाग वैभव बाबरेकर अमरावतीशहरालगतच्या समृद्ध जंगलात वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले. असून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभाग आहे. परंतु जंगल संरक्षणाची जबाबदारी ही केवळ वनविभागाची नसून त्यात नागरिकांचेही सहकार्य महत्त्वाचे आहे. वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभाग, वन्यप्रेमी, नागरिक तसेच निसर्ग संवर्धनाच्या कार्याला दिशा व गती देणाऱ्या राजकीय क्षेत्राचीसुध्दा आहे. जंगलाशेजारी जीवन जगणारे व जंगलावरच त्यांचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या ग्रामस्थांनी जंगल वाचविण्यात सक्रिय सहभाग नोंदविल्यास जिल्ह्यातील जंगल समृध्द होण्यास मोठी मदत मिळू शकेल. त्याकरिता ग्रामस्थांनी पुढाकार घेणे आता अत्यावश्यक झाले असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक स्वप्निल सोनोने यांनी दिली. पोहरा, चिरोडी जंगलात आढळून आलेल्या वाघांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.जंगल क्षेत्राला लागूनच गावकऱ्यांचे रहिवासी ठिकाणे आहेत. त्यामुळे जंगलाशेजारील गावांतील नागरिकांच्या संपर्कात वन्यप्राणी येणे साहजिकच आहे. अशावेली वन्यप्राणी व मानवी संघर्ष उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांना मानवी अस्तित्वाची जाणीव व्हावी, या दृष्टीने गावकऱ्यांनी आता पाऊल उचलणे गरजेचे आहे. ही जबाबदारी केवळ वनविभागाचीच नसून नागरिकांचे सहकार्य मिळणे गरजेचे झाले आहे.तेव्हाच जंगलाचे संवर्धन होऊ शकेल. (प्रतिनिधी)चराईमुळे जंगलासह गावकऱ्यांचेही नुकसानजंगलात जनावरांची केलेल्या चराईमुळे जंगलासह गावकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागता. ही बाब शास्त्रिय दृष्टीही सिध्द झाली आहे. गुरांनी खालेले गवताची वाढ खुंटते व ते नष्ट होते. त्यामुळे त्याठिकाणी रानतुळस किंवा तरोट्यासारख्या वनस्पती उगवितात. या प्रकारामुळे जंगलातील तृणभक्षी हरीण, निलगाय व काळविटसारखे वन्यप्राणी गावकऱ्यांच्या शेतात धाव घेतात. ही बाब नुकसान देय ठरते. ग्रामस्थ काय करु शकतातसकाळी व सायंकाळी जंगलात जाणे टाळावेगुरांना जंगलात सोडण्याऐवजी गवत कापून आणून त्यांना द्यावे. (यामुळे जनावरांचे श्रम कमी होते आणि चांगला चारा मिळाल्यास दुधाचे उत्पादनात वाढ)गवत कापून आणण्यासाठी स्थानिक जेएफएम समितीची परवानगी घ्यावी. जेणे करून ठराविक भागातील गवत कापल्यास वर्षभर गवत उपलब्ध होईलइंधनाऐवजी शासकीय योजनेतून मिळणारे एलपीजी गॅस वापरावे, तशी मागणी जेएफएम समितीकडे संस्थांमार्फत करावी. गावलगत उघड्यावर कचरा फेकू नये, त्यामुळे गावठी डुकर व कुत्र्यांची संख्या वाढून बिबट व अन्य मासंभक्षी प्राणी आकृष्ट होणार नाही.रात्रीच्या वेळेस जंगलात पायी चालणे टाळावे, लाईट सुरु ठेऊन हार्न वाजवित जाणेउन्हाळ्यात जंगलात लागणाऱ्या वणव्यांवर लक्ष ठेवणे. वणवा लागल्यास वनविभागाला माहिती कळवून सहकार्य करावे.जंगल संवर्धनाची जबाबदारी ही वनविभागासह ग्रामस्थ, वन्यप्रेमी संस्था व राजकीय क्षेत्रातील इच्छा शक्तीची आहे. यामध्ये सर्वात मोठा सहभाग हा ग्रामस्थाचा आहे. कारण ते जंगलाशेजारी राहतात. त्यामुळे त्यांनी जंगल संवर्धनाविषयी पाऊल उचलणे गरजेचे आहे. - स्वप्निल सोनोने, वन्यजीव अभ्यासक